सीए कसे व्हावे? | CA Information In Marathi.

सीए संपूर्ण माहिती मराठीत / CA Course Details In Marathi 2023

CA Information In Marathi

मित्रांनो जर तुमचा इंटरेस्ट कॉमर्स फिल्डमध्ये आहे किंवा तुम्ही कॉमर्स घेऊन शिक्षण केले आहे तर सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट एक चांगले करिअर ऑप्शन आहे.एक सीए बनणे कॉमर्स विद्यार्थ्यांची इच्छा असते.तुम्ही सीए करता करता तुम्ही पार्ट टाईम पैसे कमवू शकता तसेच तुमचे सीए कम्प्लीट झाल्यावर तुम्ही चांगली सॅलरी मिळू शकतात.

तुम्हाला जर कोणत्या कंपनीत काम करायचं नसेल तर तुम्ही स्वतःचा फर्म ओपन करून चांगले इन्कम करू शकता. स्वतःचा फर्म ओपन केल्यानंतर तुम्ही इतरांना जॉब देऊ शकतात. मित्रांनो आजची पोस्ट पूर्ण नीट वाचा यामध्ये सीए विषय संपूर्ण माहिती मराठीत आम्ही दिलेली आहे.

सीए म्हणजे काय? / सीए माहिती मराठी? / CA Information In Marathi.

मित्रांनो सीएचे काम फायनान्शियल सल्ला देणे, फायनान्शियल अकाउंटिंग करणे, ऑडिटिंगचे काम, टॅक्स संबंधित कामे करणे इत्यादी असतात. सीए भारतातील सर्वात जास्त डिमांड व रेपुटेशन कोर्स आहे.

मित्रांनो सीएच्या कोर्सची डिमांड मार्केटमध्ये कधी कमी होणार नाही.सीएच्या पोस्टवर काम करणाऱ्या लोकांना खूप जास्त सन्मान मिळतो.सीएच्या पोस्टवर काम करत असलेल्या लोकांना चांगले पॅकेज/ पगार मिळतात.

सीएचा कोर्स कुठून करावा ?

मित्रांनो भारतामध्ये सीएचा एक्साम फक्त ICAI म्हणजे Institute of Chartered Accountant of India मार्फतच होते.तुम्ही ICAI च्या www.icai.org या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून सीएचा अभ्यास करू शकतात.

सीए बनण्यासाठी काय पात्रता आहे?

मित्रांनो सीए करण्यासाठी तुमच्यासाठी दोन मार्ग असतात.पहिला सीए फाउंडेशनच्या मार्गाने व दुसरा डायरेक्ट एन्ट्रीच्या मार्गाने करू शकतात.

सीए फाउंडेशन :- सीए फाउंडेशन सीएमध्ये एन्ट्री करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आहे.यासाठी तुम्ही फक्त दहावी पास असणे आवश्यक आहे.दहावी पास झाल्यानंतर सीए फाउंडेशनसाठी तुम्ही नोंदणी करू शकतात.सीए फाउंडेशनमध्ये नोंदणी केल्यानंतर तुम्हाला 4 महिन्याचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो,त्यांनंतर तुम्ही याची परीक्षा देऊ शकतात.परंतु सीए फाउंडेशनची परीक्षा तुम्ही तेव्हाच देऊ शकता जेव्हा तुम्ही बारावीला असतांना किंवा बारावी पास झालेले असतात.

डायरेक्ट एन्ट्री मार्गाने :- मित्रांनो जर तुम्ही डायरेक्ट एन्ट्री मार्गाने सीएसाठी ऍडमिशन केले तर तुम्हाला पहिली लेव्हल सीए फाउंडेशनमध्ये नोंदणी करायची गरज पडत नाही.या मार्गाने ऍडमिशन घेण्यासाठी पात्रातासाठी तुम्ही 55% गुणांसह ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले हवे.किंवा  ते विद्यार्थी जे ICAI किंवा ICSI चे इंटरमिजिएट लेवल पास झालेले आहे ते पात्र असतात.

सीएचा अभ्यासक्रम किती स्टेप्समध्ये असतो?

विद्यार्थी मित्रांनो सीएचा अभ्यासक्रम खालील 3 स्टेप्समध्ये होतो.

  1. CA Foundation
  2. CA Intermediate
  3. CA Final

खाली आपण सविस्तरपणे या तिन्ही सीए स्टेप्सची माहिती पाहू.

CA Foundation: – सीए बनण्यासाठी सीए फाउंडेशन सगळ्यात पहिली स्टेप असते दहावीनंतर तुम्ही सीए फाउंडेशनसाठी नोंदणी करू शकता व बारावी पास झाल्यानंतर तुम्ही सीए फाउंडेशनचे पेपर देऊन ही लेवल क्लिअर करू शकतात.सीए फाउंडेशन परीक्षा देण्यापूर्वी चार महिन्याचा अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करावा लागतो.

सीए फाउंडेशन मध्ये दोन पेपर लेखी स्वरूपाचे असतात व दोन पेपर ऑप्शनल बेसिस असतात. या परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयात 40 गुण व एकंदरीत 50 टक्के गुण हवेत.सीए फाउंडेशनची परीक्षा मे आणि नोव्हेंबर महिन्यात वर्षात दोनदा होते.

CA Intermediate :- सीए फाउंडेशनची परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही CA Intermediate साठी रजिस्ट्रेशन करू शकता. सीए इंटरमीडिएटमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 8 महिन्याचा अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा असतो.सीए इंटरमीडिएटमध्ये आठ विषय असतात जे की दोन ग्रुपमध्ये विभागलेले असतात.

सीए इंटरमीडिएटच्या पेपरमध्ये पास होण्यासाठी प्रत्येक विषयात कमीत कमी 40 गुण व सगळ्या विषयांचे मिळून टोटल 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे.जेव्हा तुम्ही सीए इंटरमीडिएटचे एक किंवा दोन्ही ग्रुप क्लिअर करता तेव्हा तुम्ही इंटर्नशिप करू शकता. त्याचबरोबर चार हत्याचा इंटिग्रेटेड आयटी आणि सॉफ्टस्किल प्रोग्रॅम कम्प्लीट करावा लागतो. तेव्हाच तुम्ही तीन वर्षाच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंग साठी एनरोल करू शकतात. ही ट्रेनिंग तुम्ही सीएच्या कोणत्याही फर्म मधून करू शकतात. सीए फर्म निवडण्यापूर्वी तुम्हाला हे लक्षात घेतले पाहिजे की तुम्हाला त्या फर्म मधून भरपूर काही शिकायला मिळेल. कारण या ट्रेनिंग वर तुमचे भविष्य अवलंबून असते.

CA Final :-

मित्रांनो जेव्हा तुम्ही ती अडीच वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करतात तेव्हा तुम्ही सीए फायनलसाठी पात्र होतात. सीए फायनल मध्ये आठ पेपर असतात जे चार चार विषयांमध्ये विभागलेले असतात. सी ए फायनल पासिंग मध्ये पण तुम्हाला प्रत्येक विषयात 40 टक्के गुण व एकंदरीत टोटल टक्केवारी 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. सीए फायनल पूर्वी तुम्हाला चार महिन्याचा आयटी व सॉफ्ट स्किलचा प्रोग्राम पूर्ण करावा लागतो, तेव्हाच तुम्ही सीए फायनलसाठी पात्र होऊ शकतात. जेव्हा तुम्ही तुमची इंटर्नशिप पूर्ण करतात व सीए फायनल चे दोन्ही ग्रुप पूर्ण पास होतात तेव्हा तुम्ही सीए बनतात.

सीएचा कोर्स करण्यासाठी किती वर्षे लागतात?

जर तुम्ही सीए ची प्रत्येक लेवल वेळेवर पास झालात तर तुम्ही पाच वर्षात सीए बनवू शकतात. परंतु असे फार कमी विद्यार्थी करतात कारण की सीए फार कठीण कोर्स आहे. सीए मध्ये तुम्हाला येथे ट्रेनिंग करावे लागते व त्याचबरोबर अभ्यास व पेपर ही द्यावे लागतात. त्यामुळे ज्यादा तर विद्यार्थ्यांना सीए बनण्यासाठी पाच ते सहा वर्ष लागतात

स्टायपेंड किती असतो?

मित्रांनो जेव्हा तुम्ही इंटर्नशिप करायला लागतात तेव्हा तुम्हाला स्टायपेंड चालू होते.स्टायपेंड किती मिळेल हे त्या फर्म वर डिपेंड असते व ती किती मोठी आहे.साधारणपणे 5 ते 15 हजारच्यामध्ये स्टायपेंड दिली जाते परंतु हे त्या फर्म वर अवलंबून असते.

जेव्हा तुम्ही सीए होतात तेव्हा तुम्हाला जॉब कुठे मिळेल?

तुम्ही सीए केल्यावर तुम्हाला जॉबसाठी जास्त पाहावं लागत नाही कारण सीए फायनलनंतरच तुम्हांला जॉब ऑफर यायला सुरुवात होते.आणि ICAI सुद्धा जॉब प्लेसमेंट करतात जिथे देशातील मोठ्या मोठ्या कंपनी येतात व तुम्हाला चांगल्या पॅकेजवर जॉब ऑफर करतात.

अधिक वाचा 👇👇👇

Marathi Online – All Information in Marathi

FAQ

CA चा कोर्स किती वर्षाचा आहे?

12 वी नंतर CA अभ्यासक्रमाचा कालावधी 5 वर्षे आणि पदवी नंतर 4.5 वर्षे आहे.

CA साठी किती परीक्षा आहेत?

सीए होण्यासाठी विद्यार्थ्यांना फाऊंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल या तीन परीक्षा द्याव्या लागतात.

CA साठी तयारी कशी करावी?

सीए होण्यासाठी विद्यार्थ्यांना सीए फाउंडेशनची परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्यानंतर, विद्यार्थ्यांना सीए इंटरमीडिएटचे दोन्ही गट आणि सीए आर्टिकलशिप प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. आणि शेवटी, त्यांना चार्टर्ड अकाउंटंट होण्यासाठी सीए फायनलचे दोन्ही गट क्लिअर करावे लागतील.

CA बनण्यासाठी कोणत्या शाखेतून ऍडमिशन घ्याला पाहिजे?

सीए होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखा घ्यावी.

3 thoughts on “सीए कसे व्हावे? | CA Information In Marathi.”

Leave a Comment