गणेशोत्सव निबंध मराठी २०२३ / Ganesh chaturthi essay in marathi 2023.
Ganesh chaturthi essay in marathi :- हिंदू धर्मातील लोकांसाठी गणेश चतुर्थी हा सण अतिशय खास व पवित्र आहे. संपूर्ण भारतातील विविध ठिकाणचे लोक वर्षभर गणेश चतुर्थीची वाट पाहतात आणि हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करतात. शालेय विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये गणेश चतुर्थी निबंध लिहिण्यास सांगितले जाते. यावर्षी गणेश चतुर्थीचा सण १९ सप्टेंबर २०२३ रोजी साजरा केला जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार गणेश चतुर्थी हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरा केला जातो.
या लेखात, आम्ही इयत्ता 1 ते 12 च्या विद्यार्थ्यांसाठी गणेश चतुर्थी वर छोटे, मोठे, सोपे मराठी निबंध आणि Ganesh chaturthi esaay marathi , Ganesh chaturthi nibandh marathi, Ganesh chaturthi short essay in marathi, essay on Ganesh chaturthi in marathi सादर केले आहेत, जे विद्यार्थ्यांना गणेश उसत्व मराठी निबंध लिहिण्यासाठी खूप मदत करू शकतात.
दहा ओळीत गणेश चतुर्थी निबंध मराठीत / Ganesh chaturthi essay in marathi 10 lines 2023.
- गणेश चतुर्थी हा एक हिंदू सण आहे, जो भगवान गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो.
- या सणाला “विनायक चतुर्थी” असेही म्हणतात.
- भाद्रपद महिन्यात संपूर्ण भारतात गणेश चतुर्थी सण साजरा केला जातो.
- गणेश चतुर्थी हा 10 दिवस चालणारा हा सण आहे.
- गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक घरोघरी गणपतीची मूर्ती बसवतात.
- गणपती बाप्पाना घरी बसल्यावर पुढील 10 दिवस पूर्ण भक्तीभावाने पूजा करतात.
- आनंद चतुर्दशीला गणेश मूर्तीच्या विसर्जनाने उत्सवाची सांगता होते.
- लोक बुद्धी आणि समृद्धी मिळविण्यासाठी गणेशाची पूजा करतात.
- महाराष्ट्र राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
- गणेश चतुर्थी आनंद पसरवते आणि सर्व लोकांना एकत्र आणते.
गणेश चतुर्थी निबंध मराठी 2023 / Ganesh chaturthi essay in marathi 2023.
गणेश चतुर्थी हा हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे. हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्याच्या चतुर्थीच्या दिवशी सुरू होतो. गणेश चतुर्थी हा सण माता पार्वती आणि पिता शिव यांचा प्रिय पुत्र श्री गणेशचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीला “विनायक चतुर्थी” असेही म्हणतात. हा सण सुमारे 10 दिवस चालणारा मोठा उत्सव आहे. देशातील विविध राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, परंतु आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हा सर्वात मोठा सण आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी लोक मोठ्या थाटामाटात गणेशमूर्ती घरी आणतात. असे मानले जाते की जेव्हा गणपती घरी येतो तेव्हा तो आपल्यासोबत सुख आणि समृद्धी घेऊन येतो. लोक आनंद आणि समृद्धी मिळविण्यासाठी भगवान गणेशाची पूजा करतात. सकाळ संध्याकाळ श्रीगणेशाची आरती करून बाप्पाला दुर्वा, मोदक, लाडू इत्यादी अनेक वस्तू भक्ति भावाने अर्पण केल्या जातात.
मोदक हे खाद्यपदार्थ श्री गणेशाचे सर्वात आवडते आहे. वेगवेगळ्या भागात सार्वजनिकरित्या गणपतीची पूजा करण्यासाठी मंडळ तयार करण्यात येतात. गणेशोत्सवासाठी तयार करण्यात येणाऱ्या मंडप आकर्षक फुलांनी आणि रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात येतात. 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेश चतुर्थीची उत्सव म्हणून सुरुवात केली होती. समाजाचे संघटन करण्यासाठी आणि भारतीयांचे ब्रिटिश राजवटीपासून संरक्षण करणे हा त्यांचा उद्देश होता. भगवान गणेशाला देवांचा देव, ज्ञानाचा देव, संपत्ती आणि समृद्धीचा देव म्हटले जाते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाची तयारी केली जाते. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या रथात गणेशमूर्ती ठेवली जाते. संपूर्ण शहरात किंवा गावात थाटामाटात मिरवणूक काढली जाते. भक्त “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” नारा देतात. शेवटी श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन तलाव, नदी किंवा समुद्रात केले जाते. भाविक हा उत्सव पूर्ण भक्तिभावाने साजरा करतात आणि भविष्यातही साजरा करतील.
“वक्र तुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा…”
सोपा गणेश उसत्व मराठी निबंध 2023 / Ganesh utsav essay in marathi 2023.
भारत हा सणांचा देश आहे, जिथे सर्व सण मोठ्या थाटामाटात, आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी आहे.
गणेश चतुर्थी हा सण भारताच्या विविध भागात साजरा केला जातो, परंतु महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान श्री गणेशाचा जन्म याच दिवशी झाला होता. गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. अनेक गणेश मंडळात व मंदिरात गणपतीच्या मोठमोठ्या मूर्ती बसवल्या जातात. या दरम्यान दररोज गणपती बाप्पांची दहा दिवस पूजा केली जाते. मंडळ किंवा मंदिर परिसरातील लोक मोठ्या संख्येने श्रीगणेश दर्शनासाठी व आरतीसाठी येतात. दुसरीकडे गणेश चतुर्थीची आरास पाहण्यासाठी शहरात दूरदूरहून आवडीने येतात.
गणेशोत्सव हा हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केला जातो. काही पौराणिक कथेनुसार या दिवशी श्री गणेशाला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त झाला होता. गणपती बाप्पाची समृद्धी, बुद्धी आणि सौभाग्य देवता म्हणून मानले जाते व पूजा केली जाते.
गणेश चतुर्थीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. गणेशोत्सवाला उत्तर भारतात “गणेश चतुर्थी” नावाने प्रचलित आहे. महाराष्ट्रात या उत्सवाला गणेश चतुर्थी बरोबरच “गणेशोत्सव” असेही म्हणतात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बिनायक छविथी आणि तामिळनाडूमध्ये “विनायक चतुर्थी” म्हणून म्हटले जाते. नाव काहीही असो, देशभरात गणेश चतुर्थीचा उत्सव आणि जोश सारखाच असतो.
श्रीगणेशाची भक्तिभावाने पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व अडथळे कायमचे दूर होतात, असे म्हणतात. दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाची मूर्ती पवित्र नदी किंवा तलावात विसर्जित केली जाते.
भगवान गणेश हे ज्ञान, संपत्ती आणि सौभाग्य यांचे देव आहे. फक्त त्यांचे नाम स्मरण करून सर्व संकटे दूर होतात. आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.
Final Word / अंतिम शब्द :-
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3+ गणेश चतुर्थी निबंध मराठी / Ganesh Chaturthi Essay In Marathi 2023 आजच्या पोस्टमधील निबंध आवडले असतील अशी अपेक्षा करतो. जर तुम्हाला आजच्या पोस्टमधील गणेश उसत्व मराठी निबंध उपयोगी वाटत असतील तर तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर नक्की share करा.