टॉप 10 बारावीनंतर सरकारी नोकरी माहिती | Govt job information after 12th In Marathi.

12 वी पास सरकारी नोकरी महाराष्ट्र 2024 / 12th Pass Govt Jobs Maharashtra.

12th Pass Govt Jobs Maharashtra

आजच्या पोस्टमध्ये 12 वी नंतर फॉर्म भरता येईल असे टॉप 10 सरकारी जॉब्स विषयी माहिती देणार आहोत.
माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अनेक विद्यार्थी अशा सरकारी पदांची जास्त मागणी आणि आवाहन लक्षात घेऊन सरकारी पदासाठी तयारी करतात.

हे सरकारी पदे करिअरच्या उत्कृष्ट संभावना आणि चांगल्या पगाराच्या प्रतिष्ठित नोकरीच्या संधी प्रदान करतात, ज्यामुळे या सरकारी नोकऱ्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय पर्याय आहेत.

टॉप 10 बारावीनंतर सरकारी नोकरी माहिती / Govt Job Information After 12th In Marathi.

1. SSC CHSL

मित्रांनो सी.एच.एस.एल चे एक्साम हे SSC द्वारे घेतले जातात आणि एका वर्षांत एकदा या पदाचे फॉर्म निघत असतात. विद्यार्थ्यांमध्ये CHSL चे पद खूप फेमस आहे कारण यामध्ये तुम्ही बारावी नंतर लगेच अप्लाय करू शकतात. सी.एच.एस.एल मध्ये खूप सारी पदे आहेत जसे की, Lower Division Clerk, Data Entry Operator, Postal Assistants, Shorting Assistants, Court Clerk, etc ही सारी पदे विविध डिपार्टमेंटमध्ये भरती केली जातात.

Income Tax Department, Ministry of Coal,Ministry of Railways, Ministry of Finance, Ministry of Home Affair, इत्यादी डिपार्टमेंटमध्येवरील पदांची भरती होते.

सी.एच.एस.एलच्या एक्साममध्ये तुम्हाला खालील तीन स्टेजमधून जावे लागते.

1. Objective Type Questions
2. Discriptive Paper
3. Skill Test

पहिले तुमची ऑनलाईन परीक्षा होते ज्यामध्ये Objective Type Questions असतात. डिस्क्रिपटीव्ह पेपर मध्ये तुमची लिखित परीक्षा घेतली जाते.स्किल टेस्टमध्ये तुमची हिंदी इंग्लिश टायपिंग टेस्ट घेतली जाते.

2. NDA

एनडीएमध्ये भारतीय वायुसेना,भारतीय नौसेना,भारतीय सेना असे तीन विंग असतात. एनडीएचे एक्झाम 1 वर्षांमध्ये मध्ये दोनदा घेतले जातात.तुम्ही दोन्ही वेळेला या पदासाठी फॉर्म भरू शकतात.मित्रांनो एनडीएचे एक्साम सायन्सचे विद्यार्थी देतात ,ज्या विद्यार्थ्यांचे बारावीला मॅथ फिजिक्स विषय घेतलेले असतात ते एनडीएमध्ये फॉर्म भरायला पात्र असतात.

एनडीए परीक्षा देण्यासाठी तुमचा गणित विषय चांगला असणे आवश्यक आहे.एनडीए पात्रतामध्ये महत्वाची पात्रता तुम्ही अविवाहित असणे आवश्यक आहे.त्याचबरोबर पात्रतेमध्ये तुमचे फिजिकल असणे पण गरजेचे आहे.

एनडीएच्या पेपरमध्ये दोन पेपर असतात पहिले मॅथेमॅटिक असते व दुसरा जनरल ॲबिलिटीचा पेपर असतो. हे दोन्ही पेपर पास झाल्यानंतर तुम्हाला SSB द्वारा मुलाखतीसाठी बोलवले जाते.

3. SSC Stenographer

मित्रांनो एसएससी स्टेनोग्राफरचे एक्झाम वर्षातून एकदा होतात तेही एसएससीद्वारे घेतले जातात. एसएससी ग्रेड C आणि ग्रेड D च्या पोस्टसाठी एक्साम घेतात. या पेपरचे दोन स्टेज असतात पहिल्यामध्ये ऑनलाइन पेपर असतात ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात.या पेपरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गणित विषयाचे प्रश्न नसतात. बारावीमध्ये तुमचे कोणतेही विषय असले तरी तुम्ही हे एक्साम देण्यासाठी पात्र असतात.

दुसरी टेस्ट स्किल टेस्टमध्ये तुम्हाला शॉर्ट हँड आणि टायपिंग टेस्ट घेतली जाते. स्टेनोग्राफरला चांगले वेतन असते त्याचबरोबर इतर खूप फॅसिलिटी असतात.

4. MTS

MTS चा फुल फॉर्म मल्टी टास्किंग स्टाफ आहे, एमटीएस भरती सुद्धा एसएससीद्वारे घेतली जाते. एमटीएस भरतीला नॉन टेक्निकल एक्झाम म्हणून सुद्धा ओळखले जाते. एमटीएसमध्ये तीन प्रकारचे जॉब्स असतात आणि त्या अंतर्गत आणखी खूप प्रकारचे जॉब्स असतात.

एमटीएसच्या भरतीसाठी दहावी पास शैक्षणिक पात्रता आहे, परंतु ज्यादा तर विद्यार्थी बारावीनंतर एमटीएसचे फॉर्म भरतात. एमटीएसच्या भरतीसाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष आहे. एमटीएसचे पेपर दोन स्टेजमध्ये होतात पहिल्या स्टेजमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात ही परीक्षा पास झाल्यावर तुम्ही सेकंड स्टेजची एक्साम देऊ शकतात.

दुसऱ्या स्टेजमध्ये डिस्क्रिपटीव्ह पेपर असतात ज्यामध्ये तुम्हाला निबंध,लेटर लिहायचे असते.

5. Railway (RRB-NTPC)

मित्रांनो या अंतर्गत खूप साऱ्या पदांच्या रिक्त जागा दरवर्षी निघत असतात, काही 12 वी वर असतात तर काही ग्रॅज्युएशन वर असतात. बारावी वर कमर्शियल कम टिकेट क्लर्क , अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट, ज्युडियल क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनिअर टाईम किपर ट्रेन क्लर्क इत्यादी पदांची भरती होते. या पदांसाठी तुमच्याकडे कॉम्पुटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

परीक्षा या दोन स्टेपमध्ये होतात, पहिले प्रिलिम्स आणि दुसरे मेन्सचे टेस्ट असतात.या परीक्षेत तुम्हाला मॅथेमॅटिक, जनरल अवरनेस, जनरल इंटेलिजन्स, रिजनींग विषयावर प्रश्न विचारले जातात.

6. SSC GD Constable

SSC GD Constable अंतर्गत BSF, CISF, ITBP, CRPF, SSB, Rifleman, NIA आणि SSF इत्यादी या साऱ्या पोस्टच्या भरती होतात.या पदांची चार स्टेप्समध्ये परीक्षा होते , पहिले CBT दुसरी Physical Test तिसरी Physical establishment चौथी Medical Test या चार परीक्षामधून होऊन उमेदवारांना जावे लागते.

SSC GD Constable ची शैक्षणिक पात्रता 10 वी पास आहे. उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 23 वय इतकी आहे.
कोविड महामारीमुळे, या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांना संबंधित विहित कमाल वयोमर्यादेत तीन (03) वर्षांची सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ०२-०१-१९९७ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले उमेदवार यावेळी अर्ज करू शकतात. सरकारी निकषांनुसार, आरक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात आणि फिजिकलमध्ये काही सूट दिल्या जातात.

7. State Police

राज्य सरकारद्वारा पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या दरवर्षी भरती निघत असते. जे उमेदवार फिजिकली फिट आहेत ते पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरू शकतात.बरेच उमेदवार भरतीची तयारी कमी वयात सुरू करतात आणि त्यामध्ये धावणे आणि स्वतःला फिजिकली फिट ठेवणे, गोळा फेक, लांब उडी इत्यादीची ते तयारी करत असतात.

12 वी शैक्षणिक पात्रतेवर निघणारी पोलीस भरती भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात दरवर्षी आयोजित केली जाते. पोलीस भरतीच्या परीक्षेत पहिले लेखी परीक्षा (Objective type) दुसरी फिजिकल टेस्ट आणि तिसरी मेडिकलची टेस्ट असते. पोलीस भरतीत वयोमर्यादा 18 ते 28 इतकी असते परंतु रिजर्वेशन कॅटेगरीमधील उमेदवारांना काही वर्षांची सूट असते.

8. State Level SSC

मित्रांनो SSC ची भरती केंद्रा मार्फत घेतली जाते पण तशीच याची भरती स्टेटनुसार पण निघत असते. स्टेटमध्ये निघणाऱ्या SSC भरतीमध्ये खूप साऱ्या चांगल्या पोस्टच्या भरती दरवर्षी निघत असतात, जसे की UPSSSC, HSSC, BSSC इत्यादी राज्यानुसार वेगवेगळ्या भरती असतात.

यामध्ये पंचायत सचिव,रिव्हेनू अकाउंट वर्कर,ज्युनिअर अकाउंट क्लर्क इत्यादी अनेक पदांसाठी भरती होते. या भरतीमध्ये सगळ्यात पाहिले लेखी परीक्षा होते त्यानंतर फिजिकल टेस्ट आणि शेवटी स्किल टेस्ट घेतली जाते. भारतात विविध राज्यांचा सिलेक्शन प्रोसेस वेगवेगळी असू शकते.स्टेट लेवल SSC मध्ये खूप साऱ्या पोस्ट असतात त्याचबरोबर त्यापदावरील लोकांचे पगारही वेगवेगळे असतात.

9. Forest Guard

फॉरेस्ट गार्डची भरती सेंट्रल लेवलला निघत असते, यामध्ये देशातील जंगलातील झाडे , प्राण्यांची, रक्षा करण्याचे प्रामुख्याने काम असते. भारतामध्ये प्रत्येक वर्षी फॉरेस्ट गार्ड भरतीसाठी जागा निघत असतात.

फॉरेस्ट गार्ड पदासाठी फॉर्म भरणाऱ्या उमदेवाराचे वय 18 ते 28 च्या दरम्यान असले पाहिजे.त्यामध्ये कॅटेगरी नुसार सवलत देण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये लेखी व फिजिकल टेस्ट अश्या दोन टेस्ट असतात. लेखी परिक्षेमध्ये हिंदी,इंग्लिश,जनरल नॉलेज, मॅथ आणि जनरल सायन्स विषयाचे प्रश्न विचारले जातात.

10. Indian Coast Guard

Indian Coast Guard ला “भारतीय तटरक्षक दल” असे म्हटले जाते. यामध्ये भारताच्या समुद्र सीमांना रक्षण देण्याचे काम असते.त्याच बरोबरच मासेमारी करणाऱ्या लोकांचे संकट काळात रक्षण तसेच त्यांना मदत देण्याचे काम असते.

भारतीय तटरक्षक दलात भरती होण्यासाठी तुम्हाला बारावीमध्ये फिजिक्स,मॅथ विषय असणे गरजेचे आहे तेव्हाच तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकतात. या भरतीमध्ये लेखी परीक्षेनंतर फिजिकल टेस्ट असतात. इंडियन कोस्ट गार्डसाठी वयोमर्यादा 18 ते 22 वर्षमध्ये असणे आवश्यक आहे. भारताच्या विविध सीमांची रक्षा करण्याबरोबरच बऱ्याच विदेशी देशांना भेट देण्याचा संधी या भारतीय तटरक्षक दलात मिळत असतात.

Leave a Comment

x