हार्डवेअर इंजिनिअर माहिती मराठीत / Hardware Engineer Information In Marathi 2023.
मित्रांनो आजचा काळ हा टेक्नॉलॉजी,कॉम्पुटर,लॅपटॉपचा आहे.ज्या स्पीडने जगाची प्रगती होत आहे त्याच स्पीडने मार्केटमध्ये नवनविन टेक्नॉलॉजी येत आहे.कॉम्प्युटर व लॅपटॉप पहिल्या पेक्षा जास्त स्मार्ट होत आहेत त्यामुळे त्यांना बनवणाऱ्या व नीट करणाऱ्या इंजिनिअरची डिमांडपण वाढत आहे.मित्रणांनो जे कॉम्प्युटर बनवतात त्यांना हार्डवेअर इंजिनिअर असे म्हणतात.
मित्रांनो हार्डवेअर इंजीनियरिंग करणाऱ्या इंजिनिअरची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे.तुम्हाला माहिती आहे आजकाल कंपनी मोठी असो किंवा लहान प्रत्येक ठिकाणी कम्प्युटराईस काम झाले आहे.एवढेच नाहीतर छोट्या छोट्या दुकानात,मेडिकल शॉप,हॉस्पिटल इत्यादी ठिकाणी कम्प्युटराईस नोंदी ठेवल्या जातात.कॉम्प्युटरच्या वाढत्या वापरामुळे हार्डवेअर इंजिनिअरची डिमांड वाढली आहे.जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर आजची पोस्ट संपूर्ण नीट वाचा.
हार्डवेअर इंजिनिअर कसे व्हावे? / How to become Hardware Engineer?
आजच्या आपल्या पोस्टमध्ये हार्डवेअर इंजिनिअर कोण असतात? हार्डवेअर इंजिनिअर कसे व्हावे? आपण पाहणार आहोत.
हार्डवेअर इंजिनिअर कोण असतात? / हार्डवेअर इंजिनिअर काय असते?
मित्रांनो कॉम्पुटरमध्ये तुम्ही ज्या पार्टला स्पर्श करू शकतात त्याला हार्डवेअर असे म्हणतात.कॉम्प्युटरमध्ये मॉनिटर,रॅम,हार्डडिस्क,मदरबोर्ड हे सगळे स्पर्श करता येणारे पार्ट हार्डवेअरमध्ये येतात.
जे लोक कॉम्प्युटरला रिपेअर करून देतात त्यांना हार्डवेअर इंजिनियर असे म्हणतात. आणि याच्या अभ्यासाला हाडवेअर इंजिनिअरिंग असे म्हणतात.
हार्डवेअर इंजिनिअरिंग मध्ये कोणकोणते कोर्स असतात?
मित्रांनो हार्डवेअर इंजिनिअरिंग मध्ये तसे बरेचशे कोर्स असतात जे तुम्ही करू शकतात.मुख्यता यांच्यामध्ये दोन कोर्स असतात पहिला डिप्लोमा आणि दुसरा डिग्री कोर्स असतात.डिप्लोमा कोर्समध्ये तुम्हाला 2 ते 3 वर्षे लागतात तर डिग्री कोर्समध्ये तुम्हाला 3 ते 4 वर्षे लागतात.हार्डवेअर इंजिनिअरिंगमधील काही कोर्स खालीलप्रमाणे 👇
Hardware Diploma Course
– Computer CALC Course
– Hardware Networking Course
– Diploma in Computer CALC
– Computer Micro-processing Course
– Computer Hardware Structure
हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी फी किती असते?
मित्रांनो प्रत्येक कोर्सची वेगळी निश्चित केलेली फी असते,परंतु फी तुम्ही कोणत्या कॉलेजमधून हार्डवेअर इंजिनिअरिंग करता यावर देखील अवलंबून असते.त्यामध्ये सरकारी कॉलेज तसेच खासगी कॉलेज असतात पण रेपुटेड कॉलेज यामध्ये जास्त फी घेतात.
खासगी कॉलेजमध्ये तुम्हाला 50 हजार ते 1 लाख पर्यंत फी असू शकते.आणि जर तुम्ही खासगी कॉलेजमधून इंजिनिअरिंग करणार असाल तर फी कमी असते.
हार्डवेअर इंजिनिअरिंगमध्ये काय शिकवले जाते?
- सगळ्यात पहिले तुम्हाला कॉम्प्युटरचे स्टक्चर कसे करतात शिकवले जाते.
- कॉम्प्युटरमध्ये कोणकोणते बॉडी पार्ट कुठे लावायचे असतात व त्याचे काय उपयोग आहेत हे शिकवले जाते.
- कॉम्प्युटरमध्ये मदरबोर्ड कसे काम करते व मदरबोर्ड कसे बनवले जाते हे शिकवले जाते.
- कॉम्पुटरला कसे असेंम्बल केले जाते व कीबोर्ड व माऊसला कसे रिपेअर करतात याची माहिती दिली जाते.
- त्याचबरोबर कॉम्प्युटर नेटवर्किंग सिस्टीमची माहिती व सिपीओ च्या कामाची माहिती दिली जाते.
- सिपीओच्या मदतीने कॉम्पुटर कसे काम करते व इनपुट व आउटपुटची कार्ये सांगितली जातात.
हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी पात्रता काय आहे?
मित्रांनो हार्डवेअर इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि डिग्री असे दोन कोर्स असतात.त्यामुळे यासाठी शैक्षणिक योग्यता ही वेगवेगळी असते.
- हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी बारावी पास असणे गरजेचे आहे.
- बारावीला गणित आणि इंग्लिश विषय असणे आवश्यक आहे.
- इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
हार्डवेअर इंजिनिअरिंगसाठी टॉपची कॉलेज कोणते आहे?
हार्डवेअर इंजिनिअरिंग करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक शहरात कॉलेज मिळून जातील.जर तुम्ही मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करू इच्छित असाल तर खाली आम्ही काही टॉपची भारतातील इंजिनिअरिंग कॉलेजची लिस्ट दिली आहे.
1. IIT Delhi (New Delhi)
2. IIT Kanpur (Kanpur)
3. Bombay IIT (Mumbai)
4. IIT Kharagpur (Kharagpur)
5. IITM
6. Chandigarh University
7. Birla Institute of Technology and Science
8. National Institute of Technology
9. Indian Institute of Hardware Technology, Bangalore
10. Institute of Computer Technology & Engineering
हार्डवेअर इंजिनिअरिंगमध्ये करिअर स्कोप काय आहे?
जग जसे प्रगत होत चालले आहे त्याचप्रमाणे संपूर्ण जग कॉम्प्युटरवर डिपेंड होत चालली आहे.प्रत्येक छोट्या कामात कॉम्प्युटरचा वापर होतोय.जर तुम्ही हार्डवेअर इंजिनिअरिंगचा कोर्स केला तर तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता करायची गरज राहणार नाही.कारण जेव्हा पर्यंत जगात कॉम्प्युटरचा वापर होत राहील तोपर्यंत हार्डवेअर इंजिनिअरला काम मिळत राहणार!
हार्डवेअर इंजिनिअरला पगार किती असतो?
कोणताही कोर्सला ऍडमिशन घेण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या मनात या पगार किंवा पैशाचा विचार नक्की येतो.हार्डवेअर इंजिनिअर करून तुम्ही जॉब तर करू शकता त्याचबरोबर तुम्ही स्वतः हार्डवेअर रिपेरिंग करून लाखो रुपये कमवू शकतात.आणि जर तुम्ही जॉब केला तर तुमचा सुरुवातीचा पगार 20 ते 50 हजार असतो.जसा जसा तुमचा अनुभव वाढेल व तुम्ही मोठया कंपनीमध्ये जॉईन होतात तशी तुम्हाला जास्त पगाराची पॅकेज मिळतात.