लॉ क्लर्क कसे व्हावे? | How to become a law clerk?

लॉ क्लर्क माहिती मराठी / Law Clerk Information In Marathi.

How to become a law clerk

जर तुम्हाला एक लॉ क्लर्क किंवा कोर्ट क्लर्क बनायचे असेल तर आजची पोस्ट तुमच्यासाठी आहे. लॉ क्लर्क कसे व्हावे? या विषयावर तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या पोस्टमध्ये मिळेल.

लॉ क्लर्क काय असते? / What is a Law Clerk?

लॉ क्लर्कचा अर्थ समजण्यासाठी आपल्याला लॉ आणि क्लर्क हे दोन्ही वेगवेगळे समजून घेणे गरजेचे आहे. तर सगळ्यात पहिले क्लर्कचा अर्थ समजून घेऊया.

क्लर्क

क्लर्क असा एक व्यक्ती असतो जो कार्यालयामध्ये काम करतो आणि कागदपत्र रेकॉर्डचे काम पाहतो. आणि त्या कार्यालयातील दुसऱ्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पाहतो.

लॉ

सरकार द्वारे दिलेल्या कायदेशीर नियमांचा लॉ एक संच असतो. त्या कायदेशीर नियमांना सर्वांना पाळावे लागते नाहीतर तुमच्यावर गैर कानूनी कृत्य केल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकतो. प्रत्येक देशाकडे आपला कायदा असतो. सगळ्या देशात कायदा वेगवेगळा असला तरी तो पालन करावा लागतो.

लॉ क्लर्क :-

“काही नियम आणि नियमांचे पालन करून घटनात्मक दस्तऐवज आणि इतर कायदेशीर क्रियाकलाप तयार करणार्‍या व्यक्तीला लॉ क्लर्क म्हणतात.”

लॉ क्लर्कला judicial clerk किंवा legal clerk व Court Clerk देखील बोलले जाते.

लॉ क्लर्क बनण्यासाठी शैक्षणिक योग्यता काय आहे? / What is the educational qualification to become a law clerk?

लॉ क्लर्क बनण्यासाठी तुम्हाला लॉ चे म्हणजे “कायद्याचे ज्ञान” असणे आवश्यक आहे. कायद्याचे नॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला एलएलबी करावे लागेल. ज्या व्यक्तीकडे एलएलबीची डिग्री असते त्याला लॉयर म्हणतात. म्हणजेच लॉ क्लर्क एक लॉयर असतो.लॉ क्लर्कला एक चांगला वकील समजले जाते कारण त्याकडे कायद्याचे चांगले ज्ञान असते.

लॉ क्लर्क बनण्यासाठी दोन वेगवेगळ्या अकॅडमी शैक्षणिक पद्धती आहेत.लॉ क्लर्क बनण्यासाठी ज्यादातर विद्यार्थी B.A.L.L.B प्रोग्राम निवडतात.तुम्ही B.A.L.L.B व्यतिरिक्त इतर प्रोग्राम निवडू शकतात, जसे की तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या शिक्षणाानुसार निवडू शकतात.
उदा.तुमचा इंटरेस्ट जर बिजनेस आणि कॉपरेट इंडस्ट्रीकडे आहे तर तुम्ही B.Com L.L.B व BBA L.L.B इंटिग्रेटेड प्रोग्राम निवडला पाहिजे.तुम्हाला मोठया मोठ्या कॉपरेट कंपनीमध्ये काम करायचे आहे तर BBA L.L.B इंटिग्रेटेड प्रोग्राम घेऊ शकता.

लॉ क्लर्क बनण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणत्या स्किल्स पाहिजे? / What skills do you need to become a law clerk?

लॉ क्लर्क करियरमध्ये तुमचे स्किल्स खूप जास्त महत्वाचे ठरतात.लॉ क्लर्क बनण्यासाठी कायद्याचे ज्ञान व्यतिरिक्त काही खालील स्किल्स असल्या पाहिजेत.

 1. तुमच्याकडे कमी वेळात ध्यानपूर्ण ऐकून कमी वेळात शिकण्याची स्किल्स हवी.
 2. कोणतेही काम दिलेल्या वेळात पूर्ण करणे म्हणजे टाईम मॅनेजमेंट स्किल्स असले पाहिजे.
 3. कॉम्पुटरचे चांगले नॉलेज असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमचा कॉम्पुटर टायपिंग स्पीड चांगला असणं आवश्यक आहे.कॉम्पुटर टायपिंग स्पीड 40 ते 60 प्रत्येक मिनिट असावा.
 4. इंटरनेटवर उपलब्ध लॉ संबंधित सर्विसेस ची माहिती असणे आवश्यक आहे.
 5. तुम्हाला इंग्लिश,हिंदी भाषेचे नॉलेज असणे आवश्यक आहे.

लॉ क्लर्क कुठे काम करतात?/ Where do law clerks work?

लॉ क्लर्क Municipal offices ,OIT industry, Corporate sector, Multinational Companies (MNC) ,Law firms , Judiciary ,Advocate offices इत्यादी ठिकाणी काम करतात.

लॉ क्लर्क कसे व्हावे? / How to become a law clerk?

 1. तुम्हाला तुमची बारावी पूर्ण करावी लागेल.यासाठी तुम्ही कोणतीही शाखा निवडू शकतात परंतु तुम्हाला कमीत कमी 45% गुण असणे आवश्यक आहे.
 2. जर तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवे असेल व तुम्हाला एक चांगला लॉ क्लर्क बनायचे असेल तर तुम्हाला Entrance Exam ची तयारी करावी लागेल.
 3. भारतात बऱ्याच साऱ्या Entrance Exam आहे, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी राज्यांद्वारे जसे की CLAT व AILET द्वारे घेतले जाणारे पेपर सर्वात जास्त प्रसिद्ध एक्झाम आहेत.
 4. CLAT द्वारे तुम्ही भारतातील बऱ्याच लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकतात. या दोन एक्झाम भारतातील प्रत्येक विद्यार्थी देतो ज्याला लॉयेर व्हायचे आहे.

लॉ क्लर्क कसे बनायचे? / How to become a law clerk?

तुम्हाला L.L.B ला एका चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावा लागेल त्यासाठी बरेच कॉलेज पेपर घेतात.तुमच्या 12th च्या मार्क्सनुसार तुम्हाला ऍडमिशन मिळून जाईल.ज्या कॉलेज मध्ये तुम्ही L.L.B करायला जात आहे Bar Council Of India शी संलग्न हवी.

इंटर्नशिप आणि ट्रेनिंग

तुम्ही कॉलेजच्या मार्फत सेमिस्टर एक्साम नंतर सुट्टी असते तेव्हा इंटर्नशिपसाठी अप्लाय करू शकतात.हे बंधनकारक नाही आहे की तुम्हाला करावे लागेल पण लॉ क्लर्क बनण्यासाठी ही गोष्ट तुम्हाला मदत करेल.जर तुम्ही कधी पहिले ट्रेनिंग घेतली नसेल तर जरूर घ्यावी याचे खूप फायदे होतात इंटरव्यू देत असताना.

इंटरव्यू

तुमच्या साऱ्या स्किल्स आणि आचिवमेंट टाकून एक छान resume बनून घ्या.लॉची डिग्री घेतल्यानंतर तुमच्याकडे क्लर्क बनण्यासाठी मुख्यतःह 2 मार्ग असतात.तुम्ही कोणत्या मुन्सिपल पार्टी किंवा खासगी कंपनीला तुम्ही जॉईन होऊ शकता.बरेच सारे स्तुडेंट खासगी जॉबकडे वळतात तुम्हाला जर खासगी क्षेत्रात करिअर करायचं असेल तर तुमचा resume तयार ठेवा.

कोर्ट क्लर्क कसे बनायचे? / कोर्ट क्लर्क कसे व्हावे ? / How to become a court clerk?

 • प्रत्येक वर्षी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लॉ क्लर्कचे भरती आयोजित करतात.कोर्टात खाली जागा भरण्यासाठी LAW CLERK-CUM-RESEARCH ASSISTANT च्या भरती होतात.
 • प्रत्येक राज्याच्या हाय कोर्टमध्ये ज्यूडिशल क्लर्क एक्सामला कंडक्ट करतात आणि वेळोवेळी कोणतेही जागा रिकमी झाली तर भरती काढली जाते.
 • तर तुम्ही या एक्साम देऊन हाय कोर्ट ज्यूडिशल क्लर्क बनू शकतात.

पात्रता

 1. उमेदवार भारताचा नागरिक असला पाहिजे,आणि त्याचे कमीत कमी वय 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षे हवे.
 2. उमेदवारांकडे लॉची डिग्री असायला हवी,आणि ते विद्यार्थी फॉर्म भरून शकतात जे LLB पाच वर्षांचा कोर्स करताय आणि लास्ट वर्षात आहे.

कोर्ट क्लर्कचे काम काय असतात? / What are the duties of a court clerk?

 1. कोर्टात हजर आरोपींना गीता किंवा इतर धर्म ग्रंथांची शपथ घेणे.
 2. सगळ्या केसेसला रेकॉड करणे मेंटन करणे आणि फाईलिंग करणे, डाटा बनवणे हे सगळे कामे असतात.
 3. कोर्ट जस्टीसच्या आदेशाचे पालन करणे.

Leave a Comment