स्टेशन मास्टर कसे व्हावे? | How To Become Station Master?

स्टेशन मास्टर कसे व्हावे? / How To Become Station Master?

How To Become Station Master in marathi

मित्रांनो रेल्वे आपल्या देशाची फक्त लाईफ लाईन नाही तर आपल्या देशातील सगळ्यात जास्त सरकारी नोकरी देणारी संस्था आहे.आपल्या भारत देशात सगळ्यात जास्त सरकारी जॉब्स रेल्वेमधेच आहे.रेल्वे मध्ये जॉबसाठी युवकांमध्ये क्रेझ पाहायला मिळतो.

आजचा आपल्या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत रेल्वे स्टेशन मास्टर कसे व्हावे? / How To Become Station Master? रेल्वे स्टेशन मास्टर बनण्यासाठी पात्रता काय आहे? आजची पोस्ट सुरत पासून शेवटपर्यंत नीट वाचा स्टेशन मास्टर कसे बनायचे याबद्दल सर्व माहिती मिळेल.

स्टेशन मास्टर कोण असतात? / Who are station masters in marathi?

मित्रांनो भारतात जेवढे पण रेल्वे स्टेशन असतात तेथे स्टेशन मास्टर असतात.जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एक स्टेशन मास्टर एक रेल्वे स्टेशनचा इन्चार्ज असतो, म्हणजे त्या रेल्वे स्टेशनची सारी रिस्पॉन्सिबिलिटी त्या स्टेशन मास्टरची असते. स्टेशन मास्टर चे पद जबाबदारी पूर्ण असते कारण स्टेशनवर घडणाऱ्या कोणत्याही घटनेला स्टेशन मास्टर जबाबदार असतात.

स्टेशन मास्टरचे काम काय असते? / What is the job of a station master?

बऱ्याच लोकांना वाटते की स्टेशन मास्टरला जास्त काही काम नसते परंतु जेवढी जास्त मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तेव्हढे जास्त काम असते.स्टेशन मास्टरचे काम रेल्वेचे येण्या-जाण्यावर लक्ष ठेवणे, रेल्वेचे प्लॅटफॉर्म ठरवणे, स्टेशनची स्वच्छता, स्टेशन वरच्या सुविधा वर लक्ष देणे, जुनिअर ऑफिसर यांना काम देणे व त्यात मार्गदर्शन करणे हे एक स्टेशन मास्टरचे काम असते.

स्टेशन मास्टर बनण्यासाठी कॉलिफिकेशन काय असते? / What is the Qualification to become a Station Master?

स्टेशन मास्टर बनण्यासाठी बऱ्याच साऱ्या योग्यता असणे गरजेचे असते परंतु येथे आपण शैक्षणिक योग्यता पाहूया.

 1. स्टेशन मास्टर बनण्यासाठी उमेदवाराचे ग्रॅज्युएशन होणे गरजेचे आहे त्यांनी कोणत्याही विषयात ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले असले तरी तो पात्र असतो.
 2. तुम्हाला कम्प्युटरचे बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे.
 3. स्टेशन मास्टर उमेदवाराला प्रेशर मध्ये काम करण्याचा अनुभव पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्या ज्युनिअर सोबत काम करण्याचे स्किल्स असले पाहिजे.

स्टेशन मास्टर वयोमर्यादा काय असते? / What is the age limit of Station Master?

स्टेशन मास्टर पदासाठी सामान्य वयोमर्यादा 18 ते 32 वर्षाच्यामध्ये आहे. Sc/ St साठी 5 वर्षांची तर OBC साठी 3 वर्षांची सूट दिलेली आहे.

स्टेशन मास्टर बनण्यासाठी कोणता पेपर द्यावा लागतो? / Which paper is required to become station master?

रेल्वे स्टेशन मास्टर पदासाठी RRB म्हणजे Railway Recruitment Board परीक्षा घेत असते.हे बोर्ड दरवर्षी रेल्वे स्टेशन मास्टरची भरती काढतात त्यासाठी तुम्ही ऑनलाईन रेल्वे बोर्डाच्या वेबसाईटवर पाहू शकता.

स्टेशन मास्टर अभ्यासक्रम काय असतो? / स्टेशन मास्टर भरती प्रक्रिया / Station Master Recruitment Process

स्टेशन मस्टर पदाचा अभ्यासक्रम तीन प्रकारचा असतो तो कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही स्टेशन मास्टर बनतात.

CBT-1

 1. सगळ्यात पहिले प्री एक्झाम असते ज्याला CBT-1 असे म्हणतात.
 2. CBT-1 मध्ये तुमचे ऑनलाईन पेपर असतात ज्यात मॅथ, जनरल अवरेनेस, इंटेलिजन्स, इंग्लिश या विषयावर प्रश्न असतात.
 3. CBT-1 पेपर मध्ये 100 प्रश्न असतात आणि त्यासाठी तुम्हाला 90 मिनिटांचा टाईम दिला जातो.
 4. CBT-1 क्वालिफाय करण्यासाठी जनरल कॅटेगिरी उमेदवारांना 40 टक्के ओबीसी, एससी उमेदवारांना 30 टक्के, एस टी कॅटेगिरी उमेदवारांना 35 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
 5. हे पेपरचे मार्क फक्त क्वालिफायसाठी असतात यात पडलेले मार्क मेरिटमध्ये धरले जात नाही.

CBT-2

 1. मित्रांनो CBT-2 मेन्स पेपर ( Mains exam) असतात, यात तेच उमेदवार पेपर देऊ शकतात जे प्री एक्साम (CBT-1) क्वालिफाय झाले आहे.
 2. CBT-2 मेन्स पेपरमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असतात.
 3. CBT-2 पेपरमध्ये 120 प्रश्न असतात त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिला जातो.हा पेपर पण ऑनलाईन घेतला जातो.
 4. CBT-2 पास झाल्यानंतर तुमचे CBT-3 चे पेपर असतात.

CBT-3

 1. CBT-3 मध्ये उमेदवारांची पर्सनॅलिटी, पावर ऑफ एनालिसिस, जजमेंट पावर लीडरशिपचे गुण पाहिले जातात.
 2. CBT-3 पास झाल्यानंतर मेरिट लिस्ट बनवली जाते.
 3. मेरिटमध्ये CBT-2 चे 70% तर CBT-3 चे 30% असे गुण धरून मेरिट तयार होते.
 4. तुम्ही मेरिटमध्ये आल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते व तुमचे document व्हेरिफिकेशन होते.
 5. सर्व ठिकाणी तुम्ही क्वालिफाय झाले तर मग तुमची जॉइनिंग होते व त्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग साठी पाठवले जाते.

स्टेशन मास्टर सिलॅबस मराठी / Station Master Syllabus In Marathi.

स्टेशन मास्टर सिलॅबसमध्ये जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स अँड रीजनिंग, मॅथेमॅटिक्स विषयाचे प्रश्न विचारले जातात.

स्टेशन मास्टर पगार किती असतो? / What is the Station Master Salary?

स्टेशन मास्टर जितकी जबाबदारी पूर्ण पोस्ट आहे त्याप्रमाणे चांगली सॅलरी देखील आहे. स्टेशन मास्टर यांना सातव्या वेतन आयोगानुसार सॅलरी मिळते. स्टेशन मास्टर चा पगार 38 ते 42 हजाराची मध्ये असतो परंतु यामध्ये काही प्रकारचे भत्ते आणि आलोवन्स असतात.

Leave a Comment

x