एमबीए माहिती मराठीत | MBA Information In Marathi 2024.

एमबीए माहिती मराठीत / Information about mba in marathi 2024.

MBA Information In Marathi

मित्रांनो उज्ज्वल करिअरच्या दृष्टीने MBA एक चांगला कोर्स मानला जातो.तुम्हाला मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्ही एमबीए केले पाहिजे.एमबीएचा Master of Business Administration फुल फॉर्म आहे.एमबीए हा एक पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे. मल्टिनॅशनल कंपनीमध्ये एमबीए कोर्स करणाऱ्या प्रोफेशनल ची डिमांड फार मोठ्या प्रमाणात आहे.

एमबीए मधून खूप साऱ्या जॉबच्या संधी आहेत.तसेच एमबीए कोर्स एक उत्तम यशस्वी उद्योजक होण्यासाठी स्किल डेव्हलप करण्याचे काम करते. या कोर्समध्ये तुम्हाला यशस्वी उद्योग करण्यासाठी लागणारे सर्व गुण तुमच्यामध्ये विकसित होतात.

एमबीए म्हणजे काय? / MBA course information in marathi

एमबीए एक दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे, जो चार सेमिस्टर मध्ये विभागलेला आहे. प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर चे पेपर द्यायचे असतात. आणि तुम्हाला हे सर्व सेमिस्टर क्लिअर करावे लागतात. मित्रांनो मॅनेजमेंट फिल्डमध्ये एमबीए दुसरी पायरी असते. पहिला कोर्स असतो बीबीए आणि त्यानंतर एमबीएचा कोर्स असतो.

एमबीएच्या कोर्समध्ये व्यवसाय संबंधित सर्व माहिती दिली जाते.एमबीएच्या पहिल्या वर्षामध्ये मॅनेजमेंटचे सर्व विषय शिकवले जातात. त्यानंतर दुसऱ्या वर्षांमध्ये कोणत्या एका विषयात स्पेसिलायझेशन केले जाते.

एमबीए मध्ये करिअर करण्यासाठी तुम्ही ज्यापणं क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचे आहे त्या संबंधित कोर्स करणे गरजेचे आहे.जसे की जर तुम्हाला HR च्या फील्डमध्ये करिअर करायचे असेल तर तुम्हाला MBA HR मध्ये करावे लागेल.याचप्रकारे जर तुम्हाला International Business च्या सेकटरमध्ये जायचे असेल तर MBA IN International Business मध्ये कोर्स करावा लागेल.

एमबीए कोर्ससाठी पात्रता काय आहे?

 1. एमबीएमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुमचे ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणे गरजेचे आहे.
 2. या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही 50 टक्के गुणासह ग्रॅज्युएशन पास होणे आवश्यक आहे.
 3. तुम्ही ग्रॅज्युएशन कोणत्याही शाखेमधून केले असले तरी ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही पात्र असतात.

एमबीए मध्ये ऍडमिशन कसे घ्यावे? / MBA Information In Marathi 2023.

एमबीएमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पास करावी लागेल. तुम्ही एमबीए प्रायव्हेट कॉलेजने सुद्धा करू शकता व सरकारी कॉलेजने सुद्धा करू शकता. खाजगी कॉलेजमध्ये तुम्हाला कमी मार्क असले तरी ऍडमिशन मिळू शकते पण जर तुम्हाला सरकारी कॉलेजमधून एमबीए करायचे असेल तर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम पास व्हावे लागेल. मित्रांनो एंट्रन्स एक्झाम क्लियर केल्यानंतर एमबीए कॉलेज ग्रुप डिस्कशन व इंटरव्यू नंतर ऍडमिशन देतात.

एमबीए करण्याचे फायदे काय आहेत?

 • एमबीए केल्यावर तुम्ही फायनाशियली स्ट्रॉंग बनता जे तुमच्या करिअरसाठी महत्वाचे आहे.
 • एमबीए केल्यावर तुमची कम्युनिकेशन स्किल आणि लीडरशिप स्किल डेव्हलप होतात.
 • एमबीए केलेल्या विद्यार्थ्यांना चांगल्या सॅलरीचे जॉब मिळतात.
 • एमबीएचा कोर्स केल्यानंतर तुमच्यामध्ये अशा स्किल्स डेव्हलप होतात ज्यांच्या मदतीने तुम्ही स्टार्टअप किंवा स्वतःचा ब्रँड बनवू शकतात.
 • एमबीएच्या कोर्समुळे तुमच्यामध्ये मॅनेजमेंटची स्किल्स डेव्हलप होते ज्याचा तुम्हाला खूप उपयोग होतो.

एमबीए कोर्स करण्यासाठी फी किती असते?

एमबीए कोर्सची फी सगळ्या कॉलेजमध्ये वेगवेगळी असते. भारतातील कोणत्याही मोठ्या इन्स्टिट्यूट मधून एमबीए करण्यासाठी दहा लाख ते तीस लाख रुपये इतका खर्च लागू शकतो. सरकारी कॉलेजमध्ये एमबीएची वार्षिक फी 50 हजार ते एक लाखापर्यंत असू शकते.

एमबीए अभ्यासक्रम काय आहे?

मित्रांनो एमबीए दोन वर्षांचा कोर्स आहे जो की 4 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे.

1st Semister चा खालीलप्रमाणे आहे.

– Organization Behavior
– Marketing Management
– Quantitative Methods
– Human Resource Management
– Managerial Economics
– Business Communication
– Financial Accounting
– Information Technology Management

2nd Semister Syllabus

– Organization Effective and Change
-Management accounting
– Operation management – Management Science
– Economic environment of busines
– Marketing research
– Financial management
– Management of information system

3rd Semister Syllabus

– Business Ethics and Corporate Social Responsibility
– Strategic Analysis
– Legal environment of business
– Elective course

4th Semister Syllabus

– Project study
– International Business Environment
– Strategic management
– Elective course

एमबीएमध्ये स्पेशेलयाझेशन कोर्स कोणते आहे?

एमबीएच्या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट सर्व विषयाची माहिती दिली जाते.स्वतः निवडलेल्या स्पेशल विषयात तुम्हाला एमबीए पूर्ण करायचे असते.खाली काही एमबीए स्पेशेलयाझेशन कोर्स दिलेले आहे 👇👇👇

 • MBA in Finance
 • MBA in Marketing
 • MBA in Human Resource Management
 • MBA in International Business
 • MBA in Banking & Financial Services
 • MBA in Business Analytics
 • MBA in Rural Management
 • MBA in Healthcare Management
 • MBA in Agri Business Management
 • MBA in Entrepreneurship & Family Business Management

एमबीए केल्यानंतर जॉब कुठे आणि कसा मिळेल?

मित्रांनो तुम्हाला एमबीए केल्यानंतर जॉब करायचा असेल तर तुमच्या समोर खूप सारे ऑप्शन असतील.तुम्ही खासगी कंपनी किंवा सरकारमध्ये जॉब मिळवू शकता. IT Manager , Management analysis ,HR Manager , Financial Manager ,Financial advisor इत्यादी पदावर एमबीए झाल्यावर काम करू शकतात.

तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग, कंजूमर पॅक गुड्स, एनर्जी, मीडिया हेल्थकेअर, रिअल इस्टेट इत्यादी इत्यादी ठिकाणी तुम्हाला जॉब करता येईल. तुम्ही ज्या स्पेसिलायझेशनमध्ये एमबीए करतात त्या फिल्डमध्ये तुम्हाला जॉब मिळेल.

एमबीए झाल्यावर पगार किती मिळतो?

एमबीए झाल्यावर पगार किती मिळेल हे बऱ्याच साऱ्या गोष्टींवर अवलंबून असते. जसे की तुम्ही कोणते स्पेशलायझेशन घेऊन एमबीए पास झाला आहेत. त्या व्यक्तीचा त्या फिल्डमध्ये किती एक्सपिरीयन्स आहे. विद्यार्थ्याने कोणत्या कॉलेजमध्ये एमबीए केले आहे? त्या कॉलेजचे प्लेसमेंट कसे आहे? एमबीए स्टुडन्ट कोणत्या पोस्ट काम करत आहे? अशा वेगवेगळ्या फॅक्टर वर एमबीए स्टुडन्ट ची सॅलरी डिपेंड असते.

Leave a Comment