टॉप 5 ऑनलाईन एमबीए युनिव्हर्सिटी माहिती | Online MBA University Information In Marathi.

बेस्ट ऑनलाईन एमबीए युनिव्हर्सिटी माहिती / Best Online MBA University Information In Marathi.

Online MBA University Information in marathi

मित्रांनो आजकाल मुल शिक्षण घेत असताना काही ना काही पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम करत असतात. काही विद्यार्थी ग्रॅज्युएट झाल्यानंतर लगेच फुल टाईम जॉब करायला लागतात. हे विद्यार्थी नोकरी करत असताना पुढील शिक्षण करू इच्छित असतात. मित्रांनो आजची पोस्ट त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे मॅनेजमेंट शिक्षण घेऊ इच्छित आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण असे काही ऑनलाइन मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी पाहणार आहोत जिथे तुम्ही काम करत असताना एमबीएची डिग्री ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतात.

जय विद्यार्थ्यांना ऑनलाइन एमबीएचा कोर्स करायचा आहे परंतु ऑनलाईन एमबीएचा कोर्स कुठून करावे हे कळत नाहीये त्यांनी पोस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की नीट वाचा. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये Online MBA University Information In Marathi माहिती वाचल्यावर ऑनलाईन एमबीए कोर्स कुठून करावं हे समजेल.

ऑनलाईन एमबीए युनिव्हर्सिटी माहिती / Online MBA University Information In Marathi.

मित्रांनो तुम्ही काम करत असताना अगदी आरामात एमबीएचा कोर्स ऑनलाईन करू शकतात. आजच्या पोस्टमध्ये दिलेल्या युनिव्हर्सिटीच्या सर्टिफिकेटची व्हॅल्यू खूप जास्त आहे.

NMIMS (Narsee Monjee Institute Of Management Studies) :-

Narsee Monjee Institute Of Management Studies मित्रांनो ही युनिव्हर्सिटी मुंबई या ठिकाणी आहे. या युनिव्हर्सिटीची खासियत आहे की ही युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट सारख्या कोर्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. फक्त मुंबई महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारत देश आणि जगातील लाखो विद्यार्थी या युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंटचा ऑनलाईन कोर्स करतात.

मित्रांनो चांगली गोष्ट म्हणजे या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन आणि मास्टरचे कोर्स करू शकतात. जसे की एमबीए आहे. यावेळी युनिव्हर्सिटीमध्ये मिळणारे ऑनलाइन शिक्षण किंवा विद्यार्थ्यांना मिळणारा सुविधा किती चांगल्या आहेत या गोष्टीचा अंदाज तुम्ही ऑनलाईन जागतिक लेव्हलपर एक लाख छप्पन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी येथून एमबीएचे शिक्षण घेत आहे यावरून लावू शकतात.

मणिपाल युनिव्हर्सिटी :-

मणिपाल युनिव्हर्सिटी राजस्थानची राजधानी जयपूर येथे आहे. ही युनिव्हर्सिटी यूजीसीद्वारे मान्यता प्राप्त आहे त्याचबरोबर मॅनेजमेंट सारख्या कोर्ससाठी भारतातील टॉप युनिव्हर्सिटीपैकी एक आहे. तर तुम्ही इथून ऑनलाईन एमबीए कोर्स करू इच्छित असाल तर तुम्ही या युनिव्हर्सिटी वर ट्रस्ट ठेवू शकता.

जर तुम्ही मणिपाल युनिव्हर्सिटीमधून एमबीए करू इच्छित असाल तर तुम्ही ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल आणि जनरल कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये 50 टक्के गुण असणे आवश्यक आहे. जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 45 टक्के गुण असणे आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये एमबीएला ऍडमिशन घेऊ शकतात.

जैन युनिव्हर्सिटी :-

जैन युनिव्हर्सिटी बेंगलोर येथे आहे व या युनिव्हर्सिटीची खासियत आहे की येथे एमबीए प्रॉब्लेम इंडस्ट्रीच्या डिमांडनुसार बनवला गेलेला आहे. याचा अर्थ असा होतो की इंडस्ट्रीला विद्यार्थ्यांच्या आत मध्ये काय काय स्किल पाहिजे ? इंडस्ट्रीची काय काय रिक्वायरमेंट आहेत ? त्यानुसार जैन युनिव्हर्सिटीमधील एमबीए प्रोग्रॅम बनवला गेलेला आहे. जो की कोणत्याही विद्यार्थीसाठी एक चांगला ऑप्शन असणार आहे.

मित्रांनो जैन युनिव्हर्सिटी यूजीसीमधून अप्रू आहे, त्याचबरोबर या युनिव्हर्सिटीला NAT द्वारे ए प्लस प्लस ग्रेड दिलेला आहे. तुम्ही यानुसारच समजू शकता की या युनिव्हर्सिटीमधील शिक्षण व सुविधा आत्याधुनिक आहे तसेच वर्ड क्लास आहेत. जैन युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए साठी ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

डी वाय पाटील युनिव्हर्सिटी

ऑनलाइन एमबीए कोर्स करण्यासाठी डी वाय पाटील एक बेस्ट युनिव्हर्सिटी आहे. डी वाय पाटील युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातील पुणे येथे आहे. ऑनलाइन एमबीए कोर्स करण्यासाठी खूप सार्‍या युनिव्हर्सिटी आहेत परंतु डी वाय पाटील युनिव्हर्सिटीच्या काही विशेष सुविधा आहेत. जर विद्यार्थ्यांना येथे एमबीए कोर्स करण्यासाठी ऑनलाईन ऍडमिशन घेयचे असेल तर त्यांना भारतातीलच नाही तर भारताबाहेर बेस्ट शिक्षकांकडून शिकवले जाते.

त्याचबरोबर युनिव्हर्सिटी मार्फत विद्यार्थ्यांना 24 घंटे सपोर्ट दिला जातो. तुम्हाला कोणतीही समस्या असेल किंवा कोर्स विषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही फोन करून त्यांना विचारू शकतात. या युनिव्हर्सिटीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे एमबीए कोर्स मध्ये 14 वेगवेगळ्या विषयांचे शिकवला जातो. हे तुमच्यावर पूर्णतः अवलंबून असते की तुम्हाला एमबीए कोणत्या विषयात स्पेसिलायझेशन घेऊन करायचे आहे. त्याचबरोबर या युनिव्हर्सिटीने एमबीए प्रोग्रॅम इंडस्ट्री मार्केटच्या डिमांडनुसार बनवलेला आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार एम बी ए केल्याने त्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीज जॉबला लागल्यावर प्रॉब्लेम येतात परंतु या युनिव्हर्सिटीमधून एमबीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रिक्वायरमेंटची चांगली माहिती मिळाली असते. त्यामुळेच या युनिव्हर्सिटीने इंडस्ट्रीची डिमांड लक्षात घेऊन एमबीए प्रोग्राम डिझाईन केलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जॉब करताना कोणताही प्रॉब्लेम येऊ नये.

LPU ( Lovely Professional University )

मित्रांनो लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी भारतातील निवडक युनिव्हर्सिटीपैकी आहे जिने फार कमी वेळात जगभरात आपली छाप सोडली आहे. फक्त ऑनलाईन एमबीए कोर्स नाहीतर बाकीच्या कोर्सला सुध्दा जश्या प्रकारे सुविधा मिळतात, ज्या प्रकारे शिकवले जाते , त्यामुळे या युनिव्हर्सिटीला जगातील टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये स्थान मिळते.

लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये बाकीच्या युनिव्हर्सिटी पैकी खूप जास्त चांगल्या सुविधा आहेत. या युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना जॉब पॅकेजेस सुद्धा चांगले मिळतात. कंपनी चांगले पॅकेज तेव्हाच देतात तेव्हा त्या व्यक्तीकडून त्यांना चांगला फायदा होणार असतो त्यामुळे लवली प्रपोजिटल युनिव्हर्सिटीवर शिक्षण पाहून इंडस्ट्री भरोसा टाकतात.

FAQ

ऑनलाइन एमबीएचा आदर आहे का?

उत्तर: होय, ऑनलाइन एमबीएचा भारतामध्ये अधिकाधिक आदर होत आहे, विशेषत: ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आणि डिजिटल शिक्षणाच्या वाढीमुळे ! तथापि, नोकरीच्या बाजारपेठेत तुमची पदवी मूल्यवान आहे याची खात्री करण्यासाठी योग्य मान्यता आणि शिक्षण असलेली प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी निवडणे महत्त्वाचे आहे.

ऑनलाइन एमबीए ऑफलाइनपेक्षा चांगले आहे का?

उत्तर: ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही एमबीए प्रोग्रामचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. ऑनलाइन एमबीए लवचिकता आणि सुविधा प्रदान करते, तर ऑफलाइन एमबीए अधिक पारंपारिक वर्गात शिकण्याचा अनुभव देते. हे शेवटी आपल्या वैयक्तिक प्राधान्ये आणि परिस्थितीवर अवलंबून आहे.

ऑनलाइन एमबीएसाठी कोण पात्र आहे?

उत्तर: भारतातील ऑनलाइन एमबीएसाठी पात्रता युनिव्हर्सिटीनुसार बदलते, परंतु सामान्यतः उमेदवारांना किमान टक्केवारी किंवा CGPA सह कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. काही संस्थांना प्रवेश परीक्षेतील गुणांची देखील आवश्यकता असू शकते.

ऑनलाइन एमबीए प्लेसमेंट प्रदान करते का?

उत्तर: भारतात ऑनलाइन एमबीए प्रोग्राम ऑफर करणार्‍या बर्‍याच प्रतिष्ठित युनिव्हर्सिटी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट सपोर्ट देतात. तथापि, प्लेसमेंटची गुणवत्ता आणि यश हे संस्थेची प्रतिष्ठा, अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांची कामगिरी यासारख्या विविध घटकांवर अवलंबून असते.

एमबीएची ऑनलाइन फी किती आहे ?

उत्तर: भारतातील ऑनलाइन एमबीए प्रोग्रामची किंमत संस्था, अभ्यासक्रमाचा कालावधी आणि इतर घटकांवर अवलंबून आहे. तथापि, सरासरी, भारतातील ऑनलाइन एमबीए प्रोग्रामची किंमत 1 लाख ते 15 लाख रु. दरम्यान असू शकते.

भारतात एमबीए करणे योग्य आहे का?

उत्तर: होय, भारतात एमबीए करणे फायदेशीर ठरू शकते, कारण ते तुमच्या करिअरच्या प्रगतीच्या संधी, नेटवर्किंगच्या संधी आणि उच्च पगार देऊ शकते. तथापि, तुमच्या करिअरची उद्दिष्टे आणि वैयक्तिक प्राधान्यांनुसार योग्य संस्था आणि कार्यक्रम निवडणे महत्त्वाचे आहे.

Leave a Comment