पॅरामेडिकल कोर्स माहिती मराठी | Paramedical Course Information In Marathi.

पॅरामेडिकल कोर्स संपूर्ण माहिती मराठी / Paramedical Course Full Information In Marathi 2023.

Paramedical Course Information In Marathi

मित्रांनो बऱ्याच साऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न मोठे होऊन डॉक्टर होणे असते,पण सगळ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही.काही वेळा घरगुती प्रॉब्लेम व आर्थिक प्रॉब्लेममुळे व इतर कारणांमुळे विद्यार्थी डॉक्टर बनण्याच्या त्यांच्या स्वप्नापासून वंचित राहतात. काही विद्यार्थी असे असतात ज्यांना काही करून मेडिकल लाईन मध्ये करिअर करायचे असते. त्यांचे स्वप्नच मेडिकल लाईन मध्ये काम करायचे असते व त्यांना त्या संबंधित कोर्स करण्याची इच्छा असते.
अशामध्ये जे विद्यार्थी एमबीबीएस व दुसरे मेडिकल कोर्स करू शकत नाही ते पॅरामेडिकल कोर्स करून मेडिकल क्षेत्रात काम करतात.

मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये पॅरामेडिकल कोर्स बद्दल आपण माहिती पाहणार आहोत.पॅरामेडिकल कोर्स म्हणजे काय? पॅरामेडिकल कोर्स कसे करता येईल? पॅरामेडिकल कोर्स माहिती आजच्या पोस्टमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये काम करायचे असेल तर ही पोस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की वाचा.

पॅरामेडिकल कोर्स माहिती / Paramedical Course Mahiti Marathi.

तुम्ही पाहिले असेल की हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांपेक्षा त्यांचे सहाय्यक जास्त असतात, ज्यांना “सहाय्यक चिकित्सक” देखील म्हटले जाते.डॉक्टरांसाठी या सहाय्यकांची भूमिका खूप महत्त्वाची असते.

पॅरामेडिकल कोर्स म्हणजे काय? / What is Paramedical Course?

मित्रांनो पॅरामेडिकल कोर्स एक प्रकारचा मेडिकल कोर्सचा आहे. पॅरामेडिकलच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला सपोर्टिंग डॉक्टर असेही म्हणतात. तुम्ही दवाखान्यात गेल्यावर नेहमी पाहिले असेल की असे लोक असतात जे डॉक्टरांचे पहिले तुमचे प्राथमिक उपचार करतात. किंवा कोणत्याही सर्जरीनंतर तुमची देखभाल करण्याचे काम पॅरामेडिकल स्टाफच करत असते.

इमर्जन्सी सेवा मध्ये पॅरामेडिकल डॉक्टरच असतात जे इलाज करत असतात. ब्लड सॅम्पल घेणे, लॅबोरेटरी पाहणे, एक्स-रे घेणे इत्यादी कामे पॅरामेडिकल स्टाफ करत असतात. पॅरामेडिकल केलेल्या व्यक्तीला डॉक्टर म्हणत नाही परंतु त्यांना डॉक्टरांपेक्षा त्यांना कमी महत्त्व नसते. सहाय्यक डॉक्टर खूप वेळा रुग्णांच्या इलाज करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजवतात,त्यामुळे पॅरामेडिकलचा कोर्स मेडिकल क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचा आहे.

पॅरामेडिकल कोर्स कोण करू शकते? / Who can do paramedical course?

पॅरामेडिकल कोर्स अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे मेडिकलच्या क्षेत्रात जाऊ इच्छित तर आहे पण घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे एमबीबीएस सारखा महाग कोर्स ते करू शकत नाही.त्यामुळे असे विद्यार्थी पॅरामेडिकल कोर्स करून आपले स्वप्न पूर्ण करू शकतात.पॅरामेडिकलमध्ये Certificate Course,Diploma Course,Bachelor Course,Post Graduate Course असे चार कोर्स असतात.

जर तुम्हाला Certificate किंवा Diploma कोर्स करायचा असेल तर तुम्हाला दहावी किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे.
जर तुम्हाला Degree चा कोर्स करायचा असेल तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय घेऊन बारावी पास असणे आवश्यक आहे.व तुम्हाला Post Graduate चा कोर्स करायचा असेल तर तुमच्याकडे Bachelor Degree हवी.

पॅरामेडिकल कोर्स किती वर्षांचा असतो?

पॅरामेडिकलमध्ये चार प्रकारचे कोर्स असतात त्याप्रमाणे त्यांचे कालावधी वेगवेगळी आहेत.जर तुम्ही डिप्लोमाचा कोर्स केला तर यामध्ये 1 ते 1.5 वर्षाचा वेळ लागतो.डिग्रीच्या कोर्सला 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागतो.Certificate Course मध्ये तुम्ही कोणता कोर्स निवडता त्यावर तुमचा कालावधी डिपेंड असतो.यामध्ये वेगवेगळ्या कोर्सला वेगळा वेळ लागू शकतो ज्यामध्ये 6 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंत वेळ लागू शकतो.

पॅरामेडिकलमध्ये कोणकोणते कोर्स असतात? / Paramedical Course Details In Marathi.

पॅरामेडिकल मध्ये चार प्रकारचे कोर्स असतात त्यांना आपण विस्तृत स्वरूपात खाली जाणून घेऊया.

Certificate Course

सर्टिफिकेट कोर्स मध्ये खालील प्रकारचे कोर्स असतात.

 1. Certificate in Nursing Care Assistant
 2. Certificate in Nutrition and Childcare
 3. Certificate in Research Methodology
 4. Certificate in Dental Assistant
 5. Certificate in Lab
 6. Assistant/Technician
 7. Certificate in Home-Based Health Care
 8. Certificate in Operation Theatre Assistant
 9. Certificate in ECG and CT Scan Technician
 10. Certificate in HIV and Family Education
 11. Certificate in Rural Health Care

Diploma Course

डिप्लोमा कोर्समध्ये खालील प्रकारचे कोर्स असतात.

 1. Diploma in Operation Theatre Technology
 2. Diploma in Medical Record Technology
 3. Diploma in Rural Health Care
 4. Diploma in OT Technician
 5. Diploma in Clinical Research
 6. Diploma in Ophthalmology
 7. Diploma in Dermatology
 8. Diploma in Medical Lab Technology
 9. Diploma in Orthopaedics
 10. Diploma in Radiology
 11. Diploma in Community Health Care
 12. Diploma in Gynaecology and Obstetrics
 13. Diploma in Child Health

Bachelor Degree Course

बॅचलर डिग्री कोर्समध्ये खालील प्रकारचे कोर्स आहेत.

 1. BSc Nursing
 2. General Nursing and Midwifery (GNM)
 3. BSc Paramedic Science
 4. BSc Radiology
 5. BSc in Audiology and Speech Therapy
 6. BSc in Physician Assistant
 7. Bachelor of Physiotherapy
 8. BSc in Anaesthesia
 9. BSc Ophthalmic Technology
 10. BSc in Radiology
 11. BSc Operation Theater Technology
 12. BSc in Medical Lab Technology
 13. BSc Respiratory Therapy Technology
 14. BSc in Dialysis Technology
 15. BSc in Dialysis Therapy

Post Graduate Course

पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स मध्ये खालील प्रकारचे कोर्स आहेत.

 1. Master of Paramedic Science
 2. Master of Paramedic Practitioner
 3. Master in Physiotherapy
 4. MSc in Community Health Nursing
 5. MSc in Medical Lab Technology
 6. MSc in Pediatric Nursing
 7. MSc in Child Health Nursing
 8. MSc in Psychiatric Nursing
 9. MD in Pathology
 10. MD in Anaesthesia
 11. MD in Radiodiagnosis.

पॅरामेडिकल कोर्स करण्याचे फायदे काय आहेत?

पॅरामेडिकल कोर्सची खासियत ही आहे की तुम्ही एमबीबीएस केल्याशिवाय तुम्ही एक सहाय्यक डॉक्टर म्हणून ओळखले जातात.
तुम्ही रुग्णांना औषधे देतात रुग्णांची सेवा करतात व काही वेळाने तुम्हाला भरपूर नॉलेज मिळते जसे की एका डॉक्टरकडे असते.

पॅरामेडिकलमध्ये ऍडमिशन कसे मिळू शकते?

पॅरामेडिकलमध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला CPNET (Combined Paramedical, Pharmacy and Nursing Entrance Test) ची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल.त्याशिवाय तुम्ही JIPMER ,NEET-PG, MHT-CET, NEET-UG एंट्रन्स एक्झाम देऊ शकतात.खासगी व सरकारी कॉलेजमध्ये तुमचे मेरिटच्या आधारावर प्रवेश होईल.काही खासगी कॉलेज स्वतःचे एंट्रन्स एक्झाम घेऊन ऍडमिशन देतात.

पॅरामेडिकल कोर्स केल्यावर कुठे नोकरी मिळेल?

पॅरामेडिकल स्टाफचा स्कोप इतका मोठा आहे की हॉस्पिटलमध्ये यांची गरज व काम डॉक्टरांपेक्षा जास्त असते.त्यामुळे आजच्या वेळेला खासगी हॉस्पिटल असो की सरकारी हॉस्पिटल डॉक्टरांपेक्षा सहाय्यक डॉक्टरांची संख्या जास्त असते.त्यामुळे पॅरामेडिकल कोर्स केल्यावर तुमच्यासाठी सरकारी व खासगी क्षेत्रात खूप साऱ्या संधी उपलब्ध होतील.

पॅरामेडिकल कोर्स केल्यावर सरकारी नोकरी कशी मिळेल?

बरेच विद्यार्थी सरकारी जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात व पॅरामेडिकल कोर्स केल्यावर सरकारी जॉब मिळवण्याचे स्वप्न असते.सरकारी हॉस्पिटलमध्ये खूप साऱ्या सहाय्यक डॉक्टर पदाच्या भरती वेळोवेळी निघत असतात.तुम्ही या परीक्षेत फॉर्म भरून व पास होऊन सरकारी जॉब मिळवू शकतात.

पॅरामेडिकल कोर्स केल्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये जॉब संधी कशा आहेत?

मित्रांनो पॅरामेडिकल कोर्स केल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना सरकारी जॉब लागणे शक्य नाहीये, तरी दरवर्षी लाखो विद्यार्थी पॅरामेडिकलचा कोर्स करतात. आपल्या देशात सरकारी हॉस्पिटलपेक्षा खाजगी हॉस्पिटलची संख्या अधिक आहे, तसेच छोट्या शहरांमध्ये सरकारी हॉस्पिटल नसते परंतु खासगी हॉस्पिटल नक्कीच असते. तुम्हाला पॅरामेडिकलचा कोर्स केल्यानंतर खाजगी हॉस्पिटलमध्ये जॉबच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध असतील.

पॅरामेडिकल कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी काही टॉपची कॉलेज लिस्ट.

AIIMS Delhi – New Delhi
Delhi University
St. Xavier’s College – Mumbai
Aligarh Muslim University – UP
BHU – Varanasi
Jamia Hamdard University – New Delhi
Guru Gobind Singh Indraprastha University – New Delhi
DY Patil University – Navi Mumbai

Leave a Comment

x