4644 जागांसाठी बंपर तलाठी भरती 2023 : शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, कागदपत्रे जाणून घ्या !

तलाठी भरती माहिती मराठीत / Talathi Bharti Information In Marathi 2023.

तलाठी भरती माहिती मराठीत

विद्यार्थी मित्रांनो ज्या परीक्षेचे मागील काही दिवसापासून आपण आतुरतेने वाट पाहत होतो, नेमकी जाहिरात कधी येणार त्या संबंधित अपडेट पाहत होतो. ती परीक्षा म्हणजे तर तलाठी भरतीची परीक्षा ! तलाठी भरती परीक्षेची जाहिरात आलेली आहे.

विद्यार्थी मित्रांनो 4644 पदांसाठी ही तलाठी भरती घेण्यात येणार आहे. आपण आजच्या पोस्टमध्ये तलाठी भरती 2023 मध्ये शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, वेतनश्रेणी, परीक्षा पद्धत व फॉर्म भरण्याची तारीख व अंतिम तारीख इत्यादी माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :-

तलाठी भरती 2023 पात्रतेसाठी मतदारांनी 26/06/2023 पर्यंत पुढील शैक्षणिक अर्हता पुर्णतः पूर्ण करणे गरजेचे आहे.

  1. कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण असणे गरजेचे आहे.
  2. MH-CIT संगणक कोर्स पूर्ण असणे आवश्यक आहे, परंतु तलाठी भरतीसाठी फॉर्म भरत असताना MH-CIT सर्टिफिकेट नसले तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. तुमचे तलाठी भरती मध्ये सिलेक्शन झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत मध्ये MH-CIT कम्प्लीट करणे आवश्यक आहे.
  3. तलाठी भरती फॉर्म भरणाऱ्या व्यक्तीला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. शालेय जीवनामध्ये सर्व विद्यार्थ्यांना मराठी विषय असल्यामुळे मराठी भाषेचे ज्ञान असणार आहे.
  4. ज्या उमेदवारांना शालेय जीवनामध्ये मराठी व हिंदी विषय नव्हते त्यांना एतदर्थ मंडळाची मराठी व हिंदी भाषेची परीक्षा द्यावी लागेल.

माजी सैनिकांसाठी शैक्षणिक पात्रता :-

सैनिक म्हणून तुम्ही 15 वर्ष जर सेवा दिलेली असेल अशा माजी सैनिकांना इयत्ता दहावी उत्तीर्ण असले तरी तलाठी भरती फॉर्म भरता येईल.

तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप

  • मराठी भाषेवर 25 प्रश्न, इंग्लिश भाषेवर 25 प्रश्न, अंकगणित आणि बौद्धिक चाचणीवर 25 प्रश्न, सामान्य ज्ञानवर 25 प्रश्न असे तलाठी भरती परीक्षेत 100 प्रश्न असणार आहे. एका प्रश्नासाठी दोन मार्क असणार आहे त्यामुळे एकंदरीत 200 मार्काची परीक्षा होणार आहे.
  • तलाठी भरती परीक्षेसाठी तुम्हाला 120 मिनिटे म्हणजेच दोन तासाचा कालावधी मिळणार आहे.
  • ही तलाठी भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल म्हणजेच Computer Base परीक्षा असणार आहे आणि MCQ प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न व तो सोडवण्यासाठी चार पर्याय मिळणार आहेत.
  • तलाठी भरती परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवीधर असणे आहे, त्यामुळे परीक्षेची काठण्य पातळी किंवा परीक्षेचे स्वरूप त्या लेव्हलचे असणार आहे.
  • तलाठी भरती परीक्षा प्रक्रियेमध्ये मुलाखत परीक्षा म्हणजे इंटरव्यू होणार नाही. तुम्हाला फक्त एकच परीक्षा द्यायची आहे त्यानंतर तुमची डायरेक्ट तलाठी म्हणून निवड होते.
    तलाठी भरती 200 मार्कंची असणार आहे.
  • त्यामुळे त्यापैकी तुम्हाला 45% गुण मिळाले तरच तुमचा अंतिम निवड सूचीसाठी विचार केला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी किमान 90 गुण मिळवणे आवश्यक आहे.

तलाठी भरती अभ्यासक्रम

विषय प्रश्न विचारले जाणार एकूण गुण
मराठी व्याकरण 25 50
अंकगणित व बुद्धिमत्ता 25 50
इंग्रजी व्याकरण 25 50
सामान्य ज्ञान 25 50

तलाठी भरती फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

सर्व उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरताना आवश्यक सर्व डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात अपलोड करावीत.

  1. अर्जातील नावाचा पुरावा सिद्ध करण्यासाठी SSC मार्कशीट किंवा इतर तुमच्या शिक्षणाानुसार मार्कशीट लागणार आहे.
  2. तलाठी भरती फॉर्म भरत असतांना वयाचा पुरावा द्यावा लागणार आहे.
  3. तुम्ही जी डिग्री घेतली आहे त्याचे मार्कशीट असणे आवश्यक आहे.
  4. जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तुम्ही ST/OBC/NT अश्या कोणत्याही प्रवर्गात येत असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  5. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे नॉन क्रिमिलियेर सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.
  6. तलाठी भरती अर्ज भरणारा व्यक्ती जर दिव्यांग असेल तर त्याकडे दिव्यांग असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  7. जर तुम्ही माजी सैनिक म्हणून फॉर्म भरणार असतांन तर तुमच्याकडे माजी सैनिक असल्याचा पुरावा दाखला असणे आवश्यक आहे.
  8. जर तुम्हाला खेळाडू आरक्षण हवे असल्यास त्याबाबतचा दाखला तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
  9. जर तुम्ही अनाथ म्हणून आरक्षण घेऊ इच्छित असल्यास तुमच्याकडे अनाथ असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  10. जर तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्तचे आरक्षण घेऊन इच्छित असाल तर त्या संबंधित सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
  11. अंशकालीन कर्मचाऱ्यांना आरक्षण मिळणार आहे म्हणजे काही काळ सरकारमध्ये काम केलेल्या व्यक्तींना आरक्षण असणार आहे, परंतु त्या संबंधित कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
  12. उमेदवारांने नावामध्ये काही बदल केला असेल तर त्याबाबत पुरावा लागणार आहे.
    महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा देण्यासाठी तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असणे कंपल्सरी आवश्यक आहे.
  13. जर तुम्ही तलाठी भरती फॉर्म भरण्यापूर्वी कोणत्याही चांगल्या पदावर काम केले असेल तर तुमच्याकडे त्या कामाचे अनुभव सर्टिफिकेट असावे. जर तुम्हाला परीक्षेत समान गुण मिळाले तर अनुभव सर्टिफिकेटचा विचार केला जाईल.

तलाठी भरती 2023 संपूर्ण माहिती / तलाठी भरती इतर महत्वाच्या सूचना :-

  • तलाठी भरती परीक्षेसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
  • कोणत्याही उमेदवाराला फक्त एकाच जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. उमेदवारांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे अर्ज करता येणार नाही.
  • एका पेक्षा जास्त जिल्ह्यात तुम्ही जर अर्ज भरला तर असे अर्ज अपात्र धरण्यात येतील.
  • जर एखाद्या उमेदवाराने एकाच जिल्ह्यात दोन किंवा तीन अर्ज भरले तर त्यातील सर्वात शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.

तलाठी भरती फॉर्म फी किती आहे?

  • तलाठी भरती ऑनलाइन फॉर्म भरताना खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगिरीसाठी एक हजार रुपये फॉर्म फी आहे.
  • ओपन कॅटेगिरी सोडून बाकी सर्व राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फॉर्म फी आहे.
  • माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची फी लागणार नाहीये.

तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म भरण्याचा कालावधी किती आहे?

  1. तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म 26/6/2023 रोजी पासून भरण्यासाठी उपलब्ध झाले आहेत आणि ते 17/7/2023 पर्यंत भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
  2. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांना https://mahabhumi.gov.in या सरकारी वेबसाईटवर प्रवेशपत्राद्वारे तुमची परीक्षा कधी होईल याबाबत माहिती देण्यात येईल.

तलाठी भरती 2023 वेतनश्रेणी

  1. तलाठी भरती 2023 वेतनश्रेणी 25500 – 81100₹ पर्यंत आहे. तलाठी भरती झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पहिले वेतन 35 ते 40 हजारा दरम्यान मिळू शकते.
  2. एक तलाठीला वेतन बरोबरच अनेक भत्ते व सोई सुविधा मिळत असतात.

तलाठी भरती वयोमर्यादा काय आहे 2023 ?

  1. मित्रांनो तर तलाठी भरतीसाठी ओपन कॅटेगिरी करता वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे इतकी आहे, तर इतर प्रवर्गासाठी वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे इतकी आहे.
  2. कोरोनामुळे ओपन कॅटेगिरीतील उमेदवारांसाठी व इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
  3. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्वतंत्र सैनिकांचे पाल्य, खेळाडू यांना 45 वर्षांची वयोमर्यादा देण्यात आली आहे.

तलाठी भरती ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक खालील प्रमाणे

तलाठी भरती 2023 ऑनलाईन फॉर्म लिंक   active

Leave a Comment