कंपनी सेक्रेटरी कसे व्हावे? | Company Secretary Information In Marathi.

कंपनी सेक्रेटरी संपूर्ण माहिती मराठी / CS Information In Marathi 2023.

Company Secretary Information In Marathi

मित्रांनो वाढती लोकसंख्या व घटणाऱ्या नोकऱ्यामुळे दररोज बेरोजगारी वाढत आहे.आशा वेळेला नोकरी मिळवणे कठीण होऊन जाते परंतु अशक्य नाही.कारण मेहनत करणाऱ्या लोकांची कधी हार होत नाही.भारतात खूप साऱ्या प्रकारच्या सरकारी नोकरी आहेत पण त्यातील काहीच नोकऱ्या बदल आपल्याला माहिती असते.बऱ्याच सरकारी जॉबविषयी लोकांना माहिती होत नाही,त्यापैकी एक कंपनी सेक्रेटरीची पोस्ट आहे.यापदाविषयी बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे.

आजच्या आपल्या पोस्टमध्ये कंपनी सेक्रेटरी विषयी माहिती घेऊन आलो आहोत.

कंपनी सेक्रेटरी काय आहे? / Company Secretary In marathi.

कंपनी सेक्रेटरी एक प्रकारे कंपनी व्यवस्थित चालवणारा अधिकारी असतो.याशिवाय कंपनी सेक्रेटरी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या चीफ ॲडव्हायझर म्हणून काम करतात.जसे की फायनान्शियल रिपोर्ट बनवणे,व्यवसाय संबंधित कामे करणे, कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी डेव्हलप करणे,कंपनीला वाईट काळात मार्गदर्शन करणे इत्यादी कामे असतात.

कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

  1. कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बोर्डातून बारावी पास असणे आवश्यक आहे.
    त्यानंतर तुम्हाला 1 वर्षाचा ICSI चा कोर्स करावा लागेल.
  2. जर तुमच्याकडे वरील दोन्ही डिग्री पात्रता असेल तर तुम्ही कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी पात्र आहात.

कंपनी सेक्रेटरी वयोमर्यादा काय आहे?

  1. कंपनी सेक्रेटरी या पदासाठी कमीत कमी वय 17 वर्ष असणे आवश्यक आहे.परंतु जास्तीत जास्त वयासाठी कोणतीही मर्यादा नाहीये त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयात यापदासाठी अप्लाय करू शकतात.
  2. अश्यामध्ये जर तुम्हाला यापदावर काम करण्यासाठी आवड असेल तर तुम्ही फॉर्म भरून एक्साम पास करून जॉब करू शकतात.फक्त तुमचे वय 17 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवी.

कंपनी सेक्रेटरी कसे व्हावे? / How To Become A Company Secretary In Marathi

जर तुम्हाला कंपनी सेक्रेटरी बनायचे असेल तर ICSI द्वारे घेतले जाणारे खालील तीन कोर्स तुम्हाला करावे लागतील.
या कोर्सची पेपर वर्षांमध्ये दोनदा होतात व ICSI च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या कोर्सचे फॉर्म भरू शकतात.

Foundation Course

फाउंडेशन कोर्स बारावी पास विद्यार्थी करू शकतात. हा कोर्स एक प्रकारचा एंट्रन्स एक्झाम असतो.ICSI वर्षामध्ये जून व डिसेंबर महिन्यात या कोर्सचे एक्झाम घेतात.

Executive Program

हा कोर्स फाउंडेशन कोर्स पास झालेले विद्यार्थीच करू शकतात. या कोर्समध्ये कंपनी सेक्रेटरीची कामे चांगल्या प्रकारे शिकवले जातात.

Professional Program

हा कोर्स वरील दोन्ही कोर्स पास झालेले विद्यार्थीच करू शकतात. व हे तिन्ही कोर्स पास झाल्यानंतर तुम्ही कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी पात्र होतात.

कंपनी सेक्रेटरी कोर्स फी किती आहे?

मित्रांनो जसे मी वर सांगितले की कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी तीन कोर्स करणे गरजेचे आहे.पहिला Foundation Course ज्यासाठी 3600 रुपये फी घेतली जाते.Executive Program कोर्ससाठी 7000 च्या जवळपास फी घेतली जाते आणि शेवटचा कोर्स Professional Program यासाठी 7800 रुपये घेतले जातात.

हे लक्षात ठेवा की वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटची वेगवेगळी फी ही असू शकते.त्यामुळे कोर्स करण्यापूर्वी तुम्ही त्या इन्स्टिट्यूटची फी जाणून घ्या!

कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम काय आहे?

कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमात तीन पेपर असतात तर पहिला फाउंडेशन कोर्समध्ये खालील अभ्यासक्रम असतो.

  • Element of Bussiness Law and Manegment,
  • Financial Accounting,
  • Economics and Statics 3
  • English and Business Communication

दुसरा पेपर हा Executive Program चा असतो त्याचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे.

  • Accounting Tax Laws
  • Economic Laws
  • Company Law
  • Securities Laws and Compliances
  • General and Commercial Laws
  • Company Accounts
  • Cost and Management

तिसरा पेपर हा Professional Program चा असतो.त्याचा अभ्यासक्रम खालील प्रमाणे आहे.

  • Financial Treasury and Forex Management,
  • Governance, Business Ethics and Sustainability,
  • Drafting and Pleadings,
  • Company Secretarial Practice,
  • Strategic Management,
  • Corporate Restructuring and Insolvency,
  • Advanced Tax Laws and Practice.

कंपनी सेक्रेटरी सिलेक्शन प्रोसेस काय आहे?

कंपनी सेक्टर बनण्यासाठी तीन कोर्स करावे लागतात व ते तीनही कोर्स पास व्हावे लागतात. फाउंडेशनच्या कोर्समध्ये 4 पेपर असतात, एक्झिक्युटिव्ह च्या कोर्समध्ये 7 पेपर असतात व प्रोफेशनल कोर्सच्यामध्ये 9 पेपर असतात. हे सगळे पेपर पास झाल्यानंतर तुम्ही कंपनी सेक्रेटरी बनू शकतात.

कंपनी सेक्रेटरीला पगार किती असतो?

कंपनी सेक्रेटरीचा पगार अनुभवानुसार वाढतो व सुरुवातीच्या काळात चार ते पाच लाख वार्षिक पॅकेज मिळते. कंपनीत कंपनी सेक्रेटरीला पगारा सोबत इतरही फॅसिलिटी मिळतात.

कंपनी सेक्रेटरीचे काम काय असते?

  • कंपनी सेक्रेटरीला कंपनीच्या खूप सार्‍या कामासाठी ठेवलेले असते. कंपनी सेक्रेटरी हा कंपनी बोर्ड ऑफ डायरेक्टर, सरकार,भागधारक व रेग्युलेटरी अथोरिटीच्या मध्ये एक महत्वपूर्ण कडी आहे.
  • कंपनी सेक्रेटरी बोर्ड की प्रक्रियाचा कायदेशीर पालन करून घेतात.ज्याचे दैनंदिन देखभाल लक्ष दिले जाते.
  • कंपनीत गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस व कॉर्पोरेट गव्हर्नन्स नियमांच्या पालनावर बोर्ड ऑफ डायरेक्टरला ॲडव्हाइस देणे हे पण काम असते.
  • कंपनी ऑफिसच्या आत मध्ये या कॉर्पोरेट सेक्रेटरी सर्विसेस ला सामील करून घेणे.
  • कंपनीला प्रोत्साहन देणे, सेक्रेटरीअल रेकॉर्ड ठेवणे व बोर्ड व इतर सभांचे आयोजन करणे यासगळ्या कामांना कंपनी सेक्रेटरी करतो.

कंपनी सेक्रेटरीसाठी तयारी कशी करावी?

मित्रांनो कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठी तू मला आय सी एस आय चे तिन्ही कोर्स पास व्हावे लागतील. यासाठी तुम्हाला एक वेळापत्रक बनवावा लागेल व याच्या अभ्यासक्रमानुसार अभ्यास करावा लागेल.व या कोर्सच्या अभ्यासक्रमासाठी दररोज चार ते पाच तास वेळ द्यावा लागेल.
कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमातील जो विषय तुमचा विकास असेल त्यावर जास्त वेळ द्या.

Leave a Comment

x