बीएससी नर्सिंग कोर्स माहिती मराठी | Bsc Nursing Course Information In Marathi.

बीएससी नर्सिंग कोर्स संपूर्ण माहिती / Bsc Nursing Course Full Information In Marathi 2023.

Bsc Nursing Course Information In Marathi

आजच्या पोस्टमध्ये बीएससी नर्सिंग कोर्स बद्दल माहिती आपण पाहणार आहोत. बीएससी नर्सिंग कोर्स केल्यानंतर तुम्ही एक चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्सिंगच्या भूमिकेत काम करू शकतात. मित्रांनो डॉक्टरांना पृथ्वीवरचे देव म्हटले जाते कारण जीवन देण्याचे काम देव करतात व त्या जीवाला वाचवण्याचे काम डॉक्टर करतात. डॉक्टर उपचार करतात व रुग्णांचे देखभाल नर्स करत असतात त्यामुळे बरेच सारे विद्यार्थी नर्स बनू इच्छित आहे.

Bsc Nursing Course Details In Marathi 2023.

जर तुम्हालाही नर्सिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल तर बीएससी नर्सिंग कोर्स तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. त्यामुळे आजच्या आपल्या पोस्टमध्ये बीएससी नर्सिंग कोर्स बद्दल आम्ही संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत.

बीएससी नर्सिंग काय आहे ? / What Is BSc Nursing In Marathi ?

मित्रांनो करियर करण्यासाठी खूप सार्‍या ऑप्शन आज उपलब्ध आहेत. त्यामध्येच मेडिकल एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये प्रगती व पैसा दिवसेंदिवस वाढत जात आहे. या करिअरचा एक भाग नर्सिंग ही आहे आणि नर्स बनण्यासाठी तुम्ही बीएससी नर्सिंग कोर्स करू शकतात.

बीएससी नर्सिंग हा एक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. या नर्सिंग कोर्सच्या साह्याने तुम्ही हॉस्पिटल क्षेत्रामध्ये सहज तुमचे करिअर करू शकता. बीएससी नर्सिंग कोर्स केल्यामुळे तुम्हाला सन्मान ही मिळतो आणि पैसाही मिळतो.

बीएससी नर्सिंग पात्रता काय आहे? / What is BSc Nursing Qualification In Marathi?

  1. बीएससी नर्सिंग कोर्स मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल.
  2. या कोर्सचा एप्लीकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही बारावी सायन्स साईडने PCB विषय घेऊन पास होणे आवश्यक आहे.
  3. बारावी सायन्स मध्ये तुम्हाला कमीत कमी 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच कॅटेगिरी वाईस तुम्हाला या कोर्समध्ये गुणांमध्ये सवलत देखील मिळते.
  4. बीएससी नर्सिंग कोर्स करण्यासाठी उमेदवार शारीरिक व मानसिक रित्या फिट असणे गरजेचे आहे.

बीएससी नर्सिंग वयोमर्यादा काय आहे? / What is the age limit for BSc Nursing?

बीएससी नर्सिंग कोर्स तुम्ही कोणत्याही वयामध्ये करू शकतात यामध्ये कोणतीही वयोमर्यादा नाही. परंतु काही महाविद्यालयांमध्ये या कोर्सची किमान वयोमर्यादा सतरा वर्ष इतकी ठेवण्यात आली आहे.

बीएससी नर्सिंग फी किती आहे? / What is the BSc Nursing Fee?

  • बीएससी नर्सिंग कोर्स खूप साऱ्या सरकारी व खाजगी कॉलेज व महाविद्यालयमध्ये उपलब्ध आहे. हा नर्सिंग कोर्स चार वर्षाचा कालावधीचा आहे.
  • सरकारी कॉलेजमध्ये 40 हजार ते 80 हजारच्या दरम्यान बीएससी नर्सिंग कोर्सची फी असते.
    खाजगी कॉलेजमध्ये दीड लाख ते चार लाखच्या दरम्यान या कोर्सची फी असते.

बीएससी नर्सिंगचे फॉर्म केव्हा सुटतात?

बीएससी नर्सिंग कोर्स भारतातील खूप सारे कॉलेज व महाविद्यालय करतात.
या कोर्सचे फॉर्म दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सुटतात व जुलै महिन्यापर्यंत ऍडमिशन होऊन जाते. त्यामुळे वेळोवेळी या नर्सिंग कॉलेजच्या वेबसाईट लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
NEET मधून सुद्धा बीएससी नर्सिंग कोर्सला ऍडमिशन मिळते व त्या परीक्षेचा फॉर्म सुद्धा जानेवारीच्या सुरुवातीला सुटतो.

बीएससी नर्सिंग पेपरचा फॉरमॅट काय आहे? / What is the format of BSc nursing paper?

मित्रांनो जर तुम्हाला बीएससी नर्सिंग कोर्स करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम कॉलेज एंट्रन्स एक्झाम द्यावे लागेल. नीट एक्झाम देऊन सुद्धा तुम्ही या कोर्स साठी ऍडमिशन करू शकता.
बीएससी नर्सिंगच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये MCQ क्वेश्चन विचारले जातात. हे प्रश्न बारावी अभ्यासक्रमावर आधारित असतात आणि सर्व विषयांचे प्रश्न यात विचारलेले असतात.
NEET मध्ये 180 प्रश्न असतात त्यामध्ये फिजिक्स 45 प्रश्न ,केमिस्ट्री 45 प्रश्न व बायोलॉजी चे 90 प्रश्न असतात. या पेपर साठी तीन तासाचा वेळ दिलेला असतो.

बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम काय आहे? / What is BSc Nursing Syllabus?

बीएससी नर्सिंगमध्ये बारावी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे प्रश्न असतात.त्यामुळे तुम्हाला बीएससी नर्सिंगमध्ये जायचे असेल तर बारावीमध्ये या विषयांचा नीट अभ्यास करा. या तीन विषयात तुम्ही सखोल अभ्यास केला तर बीएससी नर्सिंग एंट्रन्स एक्झाम पास करायला काही प्रॉब्लेम येणार नाही.

बीएससी नर्सिंग कोर्स केल्यानंतर जॉब कुठे मिळेल?

मित्रांनो बीएससी नर्सिंगचा कोर्स केल्यावर तुम्हाला जॉबचे खूप साऱ्या संधी उपलब्ध होतात.बीएससी नर्सिंग हा कोर्स आहे ज्याची मेडिकल फिल्डमध्ये दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. बीएससी नर्सिंग कोर्स केल्यानंतर शासकीय रुग्णालय ,खाजगी रुग्णालय,नर्सिंग होम,पॅथॉलॉजी सेंटर,
संशोधन केंद्र,भारतीय सेना,रेल्वे इ. ठिकाणी तुम्ही करीअर करू शकता.

बीएससी नर्सिंग टॉप कॉलेज कोणती आहेत?

भारतामध्ये खूप सारे कॉलेज महाविद्यालय आहेत ज्यामध्ये बीएससी नर्सिंगचा कोर्स खूप चांगल्या प्रकारे शिकवला जातो.भारतातील काही टॉपच्या कॉलेजची लिस्ट खालीलप्रमाणे दिलेली आहे.

  1. चंदीगड विद्यापीठ, चंदीगड
  2. आचार्य इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, बंगलोर
  3. किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी
    AllMS, दिल्ली
  4. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर
  5. बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
  6. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, दिल्ली
  7. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे
  8. NIMS विद्यापीठ, जयपूर
  9. कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मंगलोर
  10. मद्रास मेडिकल कॉलेज, चेन्नई.

बीएससी नर्सिंग एक्सामची तयारी कशी करायची?

बीएससी नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण पहिले समजून घेऊन तुम्हाला दिवसात 4 ते 5 तास अभ्यासाचे वेळापत्रक बनावे लागेल.मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सगळ्या सोडवा आणि जे प्रश्न तुम्हाला सोडवता येत नाही त्याचे उत्तर शिक्षकांकडून मिळवा.

2 thoughts on “बीएससी नर्सिंग कोर्स माहिती मराठी | Bsc Nursing Course Information In Marathi.”

Leave a Comment

x